शरद पवारांना भाजपसोबत युती हवी होती, मात्र फडणवीस नको; बावनकुळेंचा खुलासा

शरद पवारांना भाजपसोबत युती हवी होती, मात्र फडणवीस नको; बावनकुळेंचा खुलासा

पहाटेच्या शपथविधीवर बावनकुळेंचं मोठा खुलासा
Published on

मुंबई : पहाटेच्या शपथविधीवरुन गेल्या काही दिवसांपासून राजकीय वातातवरण तापले आहे. अशातच, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहाटेच्या शपथविधीमुळे राज्यातील राष्ट्रपती राजवट लागू उठली, असे विधान केले. यावरुन राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा गदारोळ सुरु झाला आहे. अशातच, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठा खुलासा केला आहे. शरद पवारांना भाजप चालतो, पण फडणवीस नको होते, असे बावनकुळे यांनी म्हंटले आहे.

शरद पवारांना भाजपसोबत युती हवी होती, मात्र फडणवीस नको; बावनकुळेंचा खुलासा
मी पणं पक्ष सोडला, भांडण झाली; शरद पवारांचे टीकास्त्र, निवडणूक आयोगाचा गैरवापर

देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतील पहाटेच्या शपथविधीचा उल्लेख केला होता. तसेच या सगळ्यांची बोलणी थेट शरद पवारांशी झाली होती. त्यांना आम्ही शपथ घेणार हे माहित होतं. त्यांच्या संमतीनेच सगळं झालं होतं. पण नंतर त्यांनी धोका दिला, असं फडणवीसांनी म्हटलं होतं. यावर अखेर शरद पवारांनीही खुलासा करत पहाटेचा शपथविधी झाल्यामुळे एकच चांगलं झालं राष्ट्रपती राजवट उठली असं त्यांनी म्हंटलं आहे.

यावर शरद पवारांना भाजप चालतो पण फडणवीस नको होते. शरद पवारांना भाजपसोबत युती हवी होती पण फडणवीस मुख्यमंत्री नको होते. देवेंद्र फडणवीस सोडून कुणी ही मुख्यमंत्री आणि कुठलाही पक्ष चालला असता, असा धक्कादायक खुलासा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

दरम्यान, शरद पवार यांच्या विधानानंतर राष्ट्रपती राजवट का लागली, त्याच्या मागे कोण होते, याचे उत्तर दिले तर सर्व कड्या उघड होतील, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मात्र, अद्यापही पहाटेच्या शपथविधीवर अजित पवारांनी बोलण्यास नकार देत आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com