अमरावतीमध्ये आम्ही चिंतन करू; पराभवानंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया
मुंबई : अमरावती पदवीधर निवडणुकीचा निकाल अखेर समोर आला आहे. नागपूर पाठोपाठ अमरावतीत सुद्धा देवेंद्र फडणीसांना धक्का बसला आहे. तब्बल 30 तास झालेल्या मतमोजणीनंतर मविआ समर्थित आमदार धीरज लिंगाडे यांनी विजयी झाले आहेत. भाजपचे उमेदवार रणजित पाटील यांचा त्यांनी पराभव केला आहे. या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. अमरावतीमध्ये आम्ही मागे पडलो, असे त्यांनी म्हंटले आहे.
मी आधीच सांगितलं की निवडणुकीमध्ये आम्ही उत्तम प्रकारे लढलो. भाजप हरली असा रंग देत आहेत. पण ते राजकीय रंग देत आहेत. अमरावतीमध्ये आम्ही चिंतन करू त्याचा अभ्यास करतो आहे. पुन्हा तिथे पराभव होता कामा नये. अमरावतीमध्ये आम्ही मागे पडलो.
नाना पटोले सातत्याने भाजपवर घर फोडल्याचा आरोप करत आहेत. यावरही बावकुळेंनी प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही कोणाची घरं फोडत नाही. त्यांनी घर चांगली ठेवायला पाहिजे. आमची सिमेंटचे आहेत त्यांचे घर मातीचे आहे, असा टोला त्यांनी पटोलेंना लगावला आहे. सत्यजित तांबे यांनी आता निर्णय घ्यावा. आम्ही कुठलीही ऑफर देणार नाहीत. सत्यजित तांबे यांना आमच्याकडे यायचं असेल तर ते येतील, असेही त्यांनी म्हंटले आहे.
कसबा निवडणुकीबाबत बोलताना ते म्हणाले, कुणाल हे पोस्ट ग्रॅज्युएट आहेत. कुणाल टिळक चांगले कार्यकर्ते आहेत. त्यांनी प्रवक्ते होयलाच पाहिजे. आज उद्या संसदीय मंडळ कसबा आणि चिंचवड चे उमेदवार जाहीर करेल, असे त्यांनी सांगितले आहे.