राहुल गांधी वक्ते होऊ शकत नाही; वडेट्टीवारांच्या विधानावर बावनकुळेंचा निशाणा, म्हणाले...
नागपूर : राहुल गांधी उच्च शिक्षित आहेत, मात्र ते चांगले वक्ते नाहीत, असे विधान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. या विधानाची आता राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. यावरुन आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कॉंग्रेसवर निशाणा साधला आहे.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, काँग्रेसच्या नेत्यानी मान्य केले आहे की राहुल गांधींना भाषण देता येत नाही. राहुल गांधींना बोलता येत नाही. विजय वडेट्टीवार हे अनावधानाने का होईना पण खरं बोलून गेले. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनी असे म्हटले की, राहुल गांधी हे वक्ते होऊ शकत नाही, नेते होऊ शकत नाही, त्यामुळे इंडिया आघाडीला याचा आता विचार करावा लागेल.
28 पक्षांच्या इंडियाने विचार करावा की त्यांच्याच सहकारी पक्षाच्या काँग्रेस नेत्याने म्हटलं तेही महाराष्ट्राच्या विरोधी पक्षनेत्याने. त्यामुळे राहुल गांधींना नेतृत्व द्यायचं की नाही याचा आता इंडिया आघाडीने विचार करावा, असे त्यांनी म्हंटले आहे.
विजय वडे्टीवार यांच्या मनात काय आहे त्यांच्या विधानावरून कळतं. आपल्या सर्वोच्च नेत्याबद्दल शंका त्यांनी उपस्थित केली आहे याचा अर्थ तुम्ही काढू शकता की विजय वडेट्टीवार मिळते यांच्या मनात काय सुरु आहे, असे सूचक विधानही बावनकुळेंनी केले आहे.