...तर ही वेळ आली नसती; बावनकुळेंचा शरद पवारांवर निशाणा

...तर ही वेळ आली नसती; बावनकुळेंचा शरद पवारांवर निशाणा

निवडणूक आयोगामध्ये राष्ट्रवादीच्या निवडणूक चिन्हाबाबतची पहिली सुनावणी पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली आहे.
Published on

सांगली : निवडणूक आयोगामध्ये राष्ट्रवादीच्या निवडणूक चिन्हाबाबतची पहिली सुनावणी पार पडत आहे. या सुनावणीसाठी शरद पवार स्वतः उपस्थित राहीले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली आहे. शरद पवार आणि जयंत पाटलांनी आधी आत्मपरीक्षण करावे, राष्ट्रवादी पक्ष आयोगासमोर का गेला? असा प्रश्न बावनकुळेंनी विचारला आहे.

...तर ही वेळ आली नसती; बावनकुळेंचा शरद पवारांवर निशाणा
जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती बेकायदेशीर; अजित पवार गटाचा मोठा दावा

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, शरद पवार आणि जयंत पाटलांनी आधी आत्मपरीक्षण करावे, राष्ट्रवादी पक्ष आयोगासमोर का गेला? पक्ष वाचवण्यासाठी का धडपड करावी लागते, याचं आत्मचिंतन करावे. एकतर्फी निर्णय आणि एकतर्फी पक्ष चालवणे याचे हे परिणाम आहेत. तेव्हाच सर्वांना सांभाळून घेतले असतं तर ही वेळ आली नसती. यामुळे शरद पवार आणि जयंत पाटील यांनी आत्मपरीक्षण करावे, अशी टीका त्यांनी केली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीसंबंधित निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरु आहे. यादरम्यान अजित पवार गटाकडून पक्ष घटनेचा दाखला दिला असून आमदारांची संख्या आमच्या बाजूने अधिक असल्याचा दावा अजित पवार गटाने केला आहे. तर, जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती बेकायदेशीर असल्याचेही अजित पवार गटाने म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com