कोण पोरकट आणि कोण देशहिताचं राजकारण...; बावनकुळेंचा शरद पवारांवर निशाणा

कोण पोरकट आणि कोण देशहिताचं राजकारण...; बावनकुळेंचा शरद पवारांवर निशाणा

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं शरद पवार यांना चोख प्रत्युत्तर
Published on

मुंबई : पाटण्यातील विरोधी पक्षांच्या बैठकीवरील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले होते. 1977 साली आम्ही सरकार बनवलं पण त्यावेळी भाजप माझ्यासोबत होते. त्यावेळी ते प्राथमिक शाळेत कदाचित असतील, असा टोला शरद पवारांनी लगावला होता. या विधानाचा समाचार आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. कोण पोरकट आणि कोण देशहिताचं राजकारण करतं हे जनता दाखवून देईल, असा निशाणा बावनकुळेंनी शरद पवारांवर साधला आहे.

कोण पोरकट आणि कोण देशहिताचं राजकारण...; बावनकुळेंचा शरद पवारांवर निशाणा
ठाकरे गटाचे माजी नगरसेवक भास्कर खुरसंगे यांच्या घरावर हल्ला

काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?

पोरकट आणि स्वतःच्याच मुलाबाळांना सत्ता मिळाली म्हणून कोण राजकारण करत आहे हे महाराष्ट्रातील जनतेनं पाहिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्याध्यक्ष निवडताना सुध्दा तुम्हाला राष्ट्रवादीचा सच्चा कार्यकर्ता दिसला नाही आणि तुम्ही सुप्रियाताईंच्या हाती सूत्र दिली यातच सर्व आलं. कार्याध्यक्ष म्हणून कुणाची नियुक्ती करायची हा तुमचा प्रश्न आहे. पण देश वाचविण्याच्या नावाखाली तुम्ही विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न करत आहात पण तुमची एकजूट देशासाठी नाही तर तुमच्या परिवाराला सत्ता मिळावी यासाठी आहे. हे लोकांना माहीत आहे.

मोदींच्या नेतृत्त्वाखाली गेल्या नऊ वर्षांत जनतेचं राज्य सुरू आहे पण तुम्हाला ते बघवत नाही. म्हणून तुम्ही आमच्या राजकारणाला पोरकट राजकारण म्हणून हिणवत आहात पण जनता तुमच्या ‘मेरा घर - मेरे बच्चे‘ मोहिमेला साथ देणार नाही. कोण पोरकट राजकारण करतंय आणि कोण देशहिताचं राजकारण करतंय? हे २०२४ मध्ये जनता तुम्हाला दाखवून देईल, अशी टीका बावनकुळेंनी शरद पवारांवर केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com