...फडणवीस मुख्यमंत्री असते तर मराठा प्रश्न निकाली निघाला असता; बावनकुळेंचे विधान

...फडणवीस मुख्यमंत्री असते तर मराठा प्रश्न निकाली निघाला असता; बावनकुळेंचे विधान

मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्यात तापला आहे. यावरुन छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात वाकयुध्द रंगले आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Published on

नागपूर : मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्यात तापला आहे. यावरुन छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात वाकयुध्द रंगले आहे. या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उध्दव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा घात केला नसता आणि तेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असते तर मराठा प्रश्न निकाली निघाला असता, असे बावनकुळेंनी म्हंटले आहे. त्यांच्या या विधानाची आता चर्चा रंगली आहे.

...फडणवीस मुख्यमंत्री असते तर मराठा प्रश्न निकाली निघाला असता; बावनकुळेंचे विधान
पलीकडे आवाज जाऊ द्या; भारत-पाक सीमेवर शिंदे गरजले

महाराष्ट्रात अनेक प्रश्न शिल्लक आहे धनगर, मराठा प्रश्न आहे. उद्धव ठाकरे फेसबुक सरकार असल्याने जनतेला त्यांच्याकडून अपेक्षा नव्हती. या सरकारकडून जनतेला अपेक्षा आहे. सर्व पक्षाने सरकारला समर्थन दिले आहे. मराठा आरक्षण प्रश्न सोडविण्यासाठी देवेंद्र फडणवीस बैठकीत सगळे बोलले. मी मंत्रिमंडळात असताना त्यांनी घेतलेले निर्णय मला माहिती आहे हे सूर्य प्रकाशा एवढे सत्य आहे, असे चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हंटले आहे.

उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा घात केला नसता आणि तेव्हा फडणवीस मुख्यमंत्री असते तर मराठा प्रश्न निकाली निघाला असता. उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस आणि मराठा यांचा घात केला. उद्धव ठाकरे यांनी बेईमानी केली नसती तर मराठा आरक्षण टिकलं असतं. देवेंद्र फडणवीस यांनी ते टिकवलं असतं. तेवढी क्षमता देवेंद्र फडणवीसांमध्ये आहे. आरक्षण गेलं असलं तरी ते आणण्याची क्षमता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, छगन भुजबळांनी सरसकट आरक्षणाला विरोध केल्याने राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहे. यावर बावनकुळे म्हणाले की, छगन भुजबळ सरकारमध्ये आहे. मी त्यावर टीकाटिप्पणी करणे योग्य नाही. काही समज गैरसमज झाले असेल तर ते दूर केले जाईल. सरकार सर्व समाजाला न्याय देईल. मराठा आरक्षण देण्यासाठी भाजपने ठराव करून तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेला आहे. ओबीसी समाजाला धक्का न लावता मराठ्यांना जे आरक्षण देईल त्याला भाजपचे समर्थन आहे, असे त्यांनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com