उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना यापेक्षाही भयंकर...; बावनकुळेंचा पलटवार

वारकरी आणि पोलिसांमधील झटापटाचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

कल्पना नळसकर | नागपूर : पालखी सोहळ्यादरम्यान वारकरी आणि पोलिसांमध्ये वाद झाल्याचे दिसून आले. वारकरी आणि पोलिसांमधील झटापटाचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावरून शिंदे-फडणवीस सरकारवर आता विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मागच्या वेळी उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळी अशीच घटना झाली होती, असे त्यांनी म्हंटले आहे.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच स्पष्ट रुपाने सर्व पक्षांना आवाहन केले की, याचे राजकारण नका करू. मला वाटतं यात आणखी काही नवीन गोष्टी बोलायची गरज नाही. ज्यांना राजकारण करायचाय त्यांनी राजकारण करावे, कारण फडणवीस यांनी काल घटनेबद्दल पूर्ण स्पष्टीकरण दिलेला आहे आणि सरकार आपल्या पद्धतीने कारवाई करत आहे विरोधकांना राजनीती करायचे असेल तर त्यांनी करावे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हंटले आहे.

मागच्या वेळी अजित दादा आणि उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा यापेक्षाही भयंकर घटना झाली होती. त्या ठिकाणी पुन्हा काही होऊ नये म्हणून काही सूचना व व्यवस्था उभ्या केल्या. आणि सरकारकडून आवाहन केलं की विरोधकांनी राजकारण करू नये, राष्ट्रवादीमध्ये आता नवनवीन लोकं तयार झाले आहे. नवीन जबाबदाऱ्या मिळाल्या आहेत त्यामुळे ते उत्साहात आहेत हा राजकारणाचा विषय नाही, असा टोला त्यांनी विरोधकांना केले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com