आदित्य ठाकरे खोटारडेपणाचा कळस करताहेत : बावनकुळे
नागपूर : वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार प्रहार केला. याला आज भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. काळात कुठलेही शासकीय जीआर काढले नाही. जमीन दिली नाही. आता खोटारडेपणाचा कळस करत आहेत, असा पलटवार त्यांनी आदित्य ठाकरेंवर केला.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, ते खोटं बोलत आहे. वेदांतामध्ये माहिती अधिकारातच समोर आले आहे की मागच्या सरकारने कुठेही वेदांताला जागा दिलेली नाही. त्यासंदर्भात कुठेही बैठक घेतली नाही. त्यामुळे वेदांता परत गेला आहे. वेदांता प्रकल्प महाविकास आघाडी सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे गेला आहे. उद्धव ठाकरे 18 महिने मंत्रालयातच येत नव्हते. मग, कंपन्या कोणाशी बोलले असते. त्या काळात कुठलेही शासकीय जीआर काढले नाही. जमीन दिली नाही. आता खोटारडेपणाचा कळस करत आहेत, असा पलटवार त्यांनी आदित्य ठाकरेंवर केला.
काय म्हणाले होते आदित्य ठाकरे?
याच प्रकल्पाबाबत घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी ४ लाख कोटी घेऊन वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प येणार असं म्हटलं होतं. एमआयडीसीच्या जर्नलमध्ये 1 लाख कोटी घेऊन येणार असं आलं होतं. उपमुख्यमंत्र्यांनीदेखील ट्विट केलेलं, बैठका घेतलेलं. हे सगळं झालं असलं तरी जेव्हा आम्ही हा विषय आला तेव्हा हा प्रकल्प महाविकास आघाडी सरकार काळातच गुजरातला गेला, असा आरोप केला.