प्रणिती आणि सुशीलकुमार शिंदेंना भाजपची ऑफर? बावनकुळे म्हणाले...

प्रणिती आणि सुशीलकुमार शिंदेंना भाजपची ऑफर? बावनकुळे म्हणाले...

सुशीलकुमार शिंदे यांनी भाजपची ऑफर असल्याचा दावा केला होता. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी खुलासा केला आहे.
Published on

सोलापूर : माझा दोन वेळा पराभव झाला असताना प्रणिती आणि मला भाजपामध्ये या म्हणतात, असं मोठं वक्तव्य काँग्रेसचं नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केलं आहे. यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी खुलासा केला आहे. भाजपकडून प्रणिती शिंदे किंवा सुशील कुमार शिंदे यांना अशी भाजपकडून कोणतीही ऑफर दिली नसल्याचे बावनकुळेंनी स्पष्ट केले आहे.

प्रणिती आणि सुशीलकुमार शिंदेंना भाजपची ऑफर? बावनकुळे म्हणाले...
शिंदे गटाची हायकोर्टात याचिका; नार्वेकर आणि ठाकरे गटाला बजावली नोटीस

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, सुशील कुमार शिंदे यांनी केलेल्या वक्तव्याबाबत मी जबाबदारीने सांगत आहे की, भाजपकडून प्रणिती शिंदे किंवा सुशील कुमार शिंदे यांना अशी भाजपकडून कोणतीही ऑफर दिली नाही. मीडियाच्या माध्यमातून चुकीच्या बातम्या जात आहेत. भेट होणं ही गोष्ट वेगळी आहे. सुशीलकुमार शिंदे आणि माझी ही दोन-तीन वेळा भेट झाली आहे. पण ती गोष्ट वेगळी आहे.

कुणीही मोदींच्या नेतृत्वात भाजपचा दुपट्टा घालण्यास तयार असेल. जसे अजित दादा यांनी भाजपला समर्थन देताना सांगितले होते, जगातील सर्वोत्तम भारत निर्माण करण्याची क्षमता मोदींच्याच आहे. त्यामुळे शरद पवार यांना सोडून अजितदादा भाजपबरोबर आले, असेही त्यांनी म्हंटले आहे.

भाजपचा दुपट्टा नेहमी तयार आहे. तो कुणीही असू द्या. मात्र त्यासाठी आम्ही कुठलीही ऑफर देणार नाही आणि कुठल्याही सीट संदर्भात कमिटमेंट देणार नाही. भाजपचे खासदारकी, आमदार असे म्हणणार नाही. मोदींना साथ देण्यासाठी कोणी येत असेल तर आम्ही त्यांना नाही म्हणणार नाही, असेही बावनकुळे म्हणाले आहेत.

दरम्यान, पंतप्रधान सोलपूर दौऱ्यावर येत आहेत. याबाबत ते म्हणाले की, सोलापुरातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. सर्वसामान्य जनतेला 15 हजार घरे देण्यासाठी मोदी सोलापुरात येत आहेत. सर्वांसाठी हा आनंदाचा क्षण आहे. सोलापुरातील वॉरियर्स बैठक ही पंतप्रधान मोदी यांच्या स्वागतासाठी करण्यात आली होती, असे त्यांनी सांगितले

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com