पुण्याचे पालकमंत्रीपद गेल्यानंतर चंद्रकांत पाटील मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; चर्चांना उधाण

पुण्याचे पालकमंत्रीपद गेल्यानंतर चंद्रकांत पाटील मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; चर्चांना उधाण

पुण्याच्या पालकमंत्रीदावरून चंद्रकांत पाटील यांची उचलबांगडी करण्यात आली असून अजित पवार यांच्याकडे पुण्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे.
Published on

मुंबई : पुण्याच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटला आहे. पुण्याच्या पालकमंत्रीदावरून चंद्रकांत पाटील यांची उचलबांगडी करण्यात आली असून अजित पवार यांच्याकडे पुण्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे. अशातच, आता चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.

पुण्याचे पालकमंत्रीपद गेल्यानंतर चंद्रकांत पाटील मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; चर्चांना उधाण
राजू पाटलांचा श्रीकांत शिंदेंना टोला; काहींना पॉकेटमनी मिळावी म्हणून...

चंद्रकांत पाटील एकनाथ शिंदे यांच्या भेटीला शासकीय निवासस्थान वर्षा येथे पोहोचले आहेत. मुख्यमंत्री आणि चंद्रकांत पाटील यांच्यात महत्वाची बैठक सुरु आहे. यामुळे तर्त-वितर्कांना उधाण आले आहे. या भेटीचे कारण अद्याप गुलदस्त्यात असला तरी अजित पवार यांच्या हस्तक्षेपामुळे भाजप आमदार नाराज असल्याची माहिती मिळत होती. याच नाराजीमुळे भाजप आमदार मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी दाखल झाल्याच्या चर्चा सुरु आहेत. तसेच मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीला दांडी मारल्यानंतर अजित पवारांच्या नाराजीची चर्चा सुरु झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी रातोरात दिल्ली गाठली. अमित शाहांशी तब्बल अडीच तास चर्चा झाल्यानंतर अखेर पालकमंत्रिपदाचा फैसला झालाय. चंद्रकांत पाटलांकडंच पुण्याचं पालकमंत्रिपद काढून अजित पवारांकडं देण्यात आलं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com