पालकमंत्री पद गेल्यानंतर चंद्रकात पाटलांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, मोठ्या कामासाठी...
मुंबई : पुण्याच्या पालकमंत्रीदावरून चंद्रकांत पाटील यांची उचलबांगडी करण्यात आली असून अजित पवार यांच्याकडे देण्यात आलं आहे. यामुळे आता चंद्रकांत पाटील यांनी नाराज असल्याच्या चर्चा सुरु होत्या. यानंतर चंद्रकांत पाटील यांनी पहिल्यांदाच कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे. मोठ्या कामासाठी केलेली ही छोटी तडजोड आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.
पालकमंत्री गेल्यान नाराज होवू नका. मोठ्या कामासाठी केलेली ही छोटी तडजोड आहे. माझं शासकीय विश्रमगृहातील कार्यालय सुरू राहणार आहे. काम पण सुरू राहणार आहेत. नाराज न होता लोकसभा निवडणूकीच्या कामाला लागा. बारामती लोकसभा मतदारसंघ जिंकायची ही संधी आहे. हेवेदावे बाजूला सारून कामाला लागा, अशा सूचना चंद्रकांत पाटलांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.
दरम्यान, मंत्रिमंडळ बैठकीला दांडी मारल्यानंतर अजित पवारांच्या नाराजीची चर्चा सुरु झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी रातोरात दिल्ली गाठली. अमित शाहांशी तब्बल अडीच तास चर्चा झाल्यानंतर अखेर पालकमंत्रिपदाचा फैसला झालाय. चंद्रकांत पाटलांकडंच पुण्याचं पालकमंत्रिपद काढून अजित पवारांकडं देण्यात आलं होते.