संदीपान भुमरेंच्या टीकेला खैरेंचे उत्तर; हा दहा दिवसांचा पालकमंत्री

संदीपान भुमरेंच्या टीकेला खैरेंचे उत्तर; हा दहा दिवसांचा पालकमंत्री

उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींच्या भेटीवर संदिपान भुमरेंची टीकेला चंद्रकांत खैरेंचे प्रत्युत्तर
Published on

छत्रपती संभाजी नगर : राज्यात उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्या भेटीची चर्चा रंगली आहे. राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांची ही पहिलीच भेट असणार आहे. यावर शिंदे गटाचे नेते संदीपान भुमरेंनी जोरदार टीका केली आहे. राहुल गांधी मातोश्रीवर गेल्याने काही महत्त्व वाढणार नाही. मातोश्रीवर कुणी आलं काय आणि गेलं काय काही विषय नाही, असा टोला संदीपान भुमरे यांनी लगावला होता. याला ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरेंनी प्रत्युत्तर दिले आहे.

संदीपान भुमरेंच्या टीकेला खैरेंचे उत्तर; हा दहा दिवसांचा पालकमंत्री
राहुल गांधी उध्दव ठाकरेंची भेट घेणार? संदीपान भुमरेंची बोचरी टीका, मातोश्रीवर...

काय म्हणाले होते संदीपान भुमरे?

मातोश्रीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गेल्याने महाविकास आघाडी भक्कम होणार नाही. गाठीभेटीने महाविकास आघाडी भक्कम होत नाही त्यासाठी काम करावे लागत. राहुल गांधी मातोश्रीवर गेल्याने काही महत्त्व वाढणार नाही. बाळासाहेब होते तेव्हा विषय वेगळा होता. आता हे स्वतः दुसरीकडे जातात म्हणून त्यामुळे मातोश्रीवर कुणी आलं काय आणि गेलं काय काही विषय नाही, असे संदीपान भुमरे यांनी म्हंटले होते.

या टीकेचा चंद्रकांत खैरेंनी समाचार घेतला आहे. संदिपान भुमरे हा दहा दिवसांचा पालकमंत्री. दहा दिवसानंतर संदिपान भुमरे पालकमंत्री राहणार नाही. त्याला महत्त्व मी देत नाही, अशा शब्दात खैरेंनी प्रत्युत्तर दिले आहे.

तर, शिंदे-फडणवीस सरकार लवकरच पडणार असल्याचे संकेत चंद्रकांत खैरेंनी दिले आहेत. मंत्रालयात हालचाली सुरू आहे. मंत्रालयातील अधिकारी म्हणतात, सरकार बदलणार. अधिकाऱ्यांनी गाठोडे बांधायला सुरु केलं आहे, मंत्रालयातून माहिती घ्या, सुगावा घ्या, असे त्यांनी म्हंटले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com