खोके घेऊन मिळालेले बहुमत टिकणार नाही; खैरेंचं शिंदे गटावर टीकास्त्र

खोके घेऊन मिळालेले बहुमत टिकणार नाही; खैरेंचं शिंदे गटावर टीकास्त्र

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर आज निर्णय जाहीर केला जाणार आहे. यावर ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Published on

छत्रपती संभाजीनगर : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर आज निर्णय जाहीर केला जाणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल जाहीर करणार आहेत. सर्वांचेच लक्ष या निकालाकडे लागले आहे. यावर ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

खोके घेऊन मिळालेले बहुमत टिकणार नाही; खैरेंचं शिंदे गटावर टीकास्त्र
परीक्षार्थींनी दिवे लावू नये म्हणून Phdचा पेपर फोडण्याचे कारस्थान केले का; वडेट्टीवारांचा टोला

चंद्रकांत खैरे म्हणाले की, निकाल आमच्या बाजूने लागायला हवा ही इच्छा आहे. मात्र, स्पीकरला मुख्यमंत्री भेटतात. ते आरोपीला भेटतात हे योग्य नाही. हे गौडबंगाल, सेटिंग आहे, अशी टीका त्यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी खूप अतिरेक केला आहे, यांना वाटत फक्त आम्हीच आहोत. खोके घेऊन मिळालेले बहुमत टिकणार नाही. किती दिवस राहिले आता, लोकसभेच्या निवडणूक जवळ आल्यास त्यांना डाऊन व्हावे लागेल, असे त्यांनी म्हंटले आहे.

लोकशाही मराठी चॅनेल बंद करण्याचे आदेश माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून देण्यात आलं आहे. सहा वाजेपासून चॅनेल बंद करण्याते आदेश दिले आहेत. मंत्रालयाकडून चॅनेलचं लायन्सस 30 दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहे. यावरही चंद्रकांत खैरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. कोर्टात जावं लागेल न्याय निश्चित मिळेल. याप्रकारे आणीबाणी लावायला सुरुवात केली आहे. लोकशाही चॅनलला बंदी घालणे लोकशाहीचा आपमान आहे, असे खैरेंनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com