महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांनी चैत्यभूमीवर येऊ नये, आनंदराज आंबेडकरांचे विधान
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी दादर चैत्याभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून अनुयायी त्या ठिकाणी दाखल होतात. दरम्यान बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी कालपासून त्या ठिकाणी अनुयायी आता येत आहेत. मात्र, याच पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू रिपब्लिकन सेना अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी मोठे विधान केले आहे. थोर महापुरुष यांच्यावर भाष्य, वक्तव्य करणाऱ्यांनी चैत्यभूमीवर येऊ नये, असे ते म्हणाले आहे.
माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी आम्हाला रिपब्लिकन सेनेच्या वतीने अभिवादन सभा घ्यायची आहे. मात्र, आम्हाला शौचालयच्या बाजूला जागी दिली आहे. पोलिसांकडून अभिवादन सभा कोपऱ्यात करण्याचे सांगितले जात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महापुरुषांचा अवमान होईल अशा कुठल्याही ठिकाणी जागा देऊ नये. मात्र, लोकांचा रोष वाढवू नका याची काळजी घेतली पाहिजे. त्याबाबत पोलीस आम्हला सहकार्य करतील. असे ते म्हणाले.
पुढे त्यांनी राज्यात महापुरुषांबद्दलच्या होणाऱ्या वादग्रस्त विधानावर भाष्य केले ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल देखील अवमान करणाऱ्यांवर कारवाई होत नाही. राज्यात आज चाललंय काय? महापुरुषांचा अवमान केला जात आहे हे कोठे तरी थांबले पाहिजे. महापुरुषांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्या संदर्भात सरकारने निर्णय घ्यावा. थोर महापुरुषांवर वादग्रस्त भाष्य, वक्तव्य करणाऱ्यांनी चैत्यभूमीवर येऊ नये, त्यांनी दूर राहावे. अशा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.