Ramdas Athawale
Ramdas AthawaleTeam Lokshahi

निवडणूक आयोगाच्या निर्णयावर रामदास आठवलेंची प्रतिक्रिया; म्हणाले, लोकशाहीचा कुठेही अपमान...

त्यावेळेस 105 आमदार असून सुद्धा भाजप विरोधी बाकावर बसली. त्यावेळी आम्ही बहुमताचा आदर केला.
Published by :
Sagar Pradhan
Published on

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाने राज्याच्या राजकारणात प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे. काल निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले. आयोगाच्या निर्णयानंतर ठाकरे गटात एकच खळबळ उडाली आहे. आता या निर्णयामुळे ठाकरे गटात आणि शिंदे गटात वाद आता आणखीच तीव्र झाला आहे. यावरूनच आरोप- प्रत्यारोप सुरु असताना आता यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Ramdas Athawale
धनुष्यबाण चोरीला गेला; या चोरीसाठी दिल्लीतील एखाद्या महाशक्तीने..., राऊतांची भाजपवर अप्रत्यक्ष टीका

काय म्हणाले रामदास आठवले?

निवडणूक आयोगाने दिलेला निकाल शिंदे गटाच्या बाजूने आहे. शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने दिले ते लोकशाहीचा आदर करणारं आहे. यात लोकशाहीचा कुठेही अपमान नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बहुमताने आमदार आणि खासदार आहेत. उद्धव ठाकरेंकडे अगदी कमी मेजॉरिटी असल्यामुळे, निवडणूक आयोगाने हा निकाल दिला आहे आणि त्याचे स्वागत करतो. असे आठवले म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, शिवसेने भाजपसोबत युती केली असती तर उद्धव ठाकरेंवर ही वेळ आली नसती. लोकशाहीत बहुमताला महत्त्व असतं. त्यावेळेस तुम्ही तिघे मिळून एकत्र येऊन सत्ता स्थापन केली. त्यावेळेस 105 आमदार असून सुद्धा भाजप विरोधी बाकावर बसली. त्यावेळी आम्ही बहुमताचा आदर केला. आणि तुम्ही सत्ता भोगली. त्यामुळे आता 164 आमदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या पाठीमागे असल्याने भाजप युतीचे सरकार आहे. असे ते यावेळी म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com