औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांच्या नामांतरावर आठवलेंचे भाष्य म्हणाले, 'केवळ नाव...
काल केंद्र सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांच्या नामांतराला अखेर मंजुरी दिली. हा प्रस्ताव अनेक दिवसांपासून केंद्र सरकारकडे प्रलंबित होता. या केंद्र सरकारच्या निर्णयाचे आता सर्वांकडून स्वागत होत आहे. तर दुसरीकडे यावरून पुन्हा एकदा राजकारण सुरु झाले आहे. अनेक नेत्यांची यावर प्रतिक्रिया येत असताना आता केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी यावर भाष्य केले आहे.
नेमकं काय म्हणाले रामदास आठवले?
औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला केंद्र सरकारने मंजुरी दिल्यानंतर रामदास आठवले यांनी यावर भाष्य केले आहे. ते म्हणाले की, औरंगाबादचा विकास होत आहे, पण उस्मानाबाद ड्राय झोन आहे. त्यामुळे केवळ नाव बदलून विकास होणार नाही. मात्र, उस्मानाबादचा विकास करण्याचा सरकारचा प्रयत्न असून मोदी सरकार विकास करण्यासाठी प्रयत्नशील आहे’ असा विश्वास रामदास आठवलेंनी व्यक्त केला.
या दोन्ही शहरांच्या नामांतराच्या निर्णयानंतर सगळीकडून स्वागत होत असताना मात्र, दुसरीकडे एमआयएमने नामांतराच्या निर्णयला विरोध केला आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी हा निर्णय अमान्य करत या निर्णयाविरोधात मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. यावरूनच रामदास आठवलेंनी जलील यांच्या समाचार घेतला आहे. आपल्या कवितेच्या माध्यमातून त्यांनी जलील यांच्यावर टिकास्त्र सोडलं. ‘जलील नही खलील होना चाहीए’ अशी टीका रामदास आठवलेंनी जलील यांच्यावर केली आहे.