'शिंदे गटाला अस्तित्व टिकवण्यासाठी  भाजपासोबतचं संघर्ष करावा लागेल'

'शिंदे गटाला अस्तित्व टिकवण्यासाठी भाजपासोबतचं संघर्ष करावा लागेल'

शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांनी आज चिपळूण येथे पत्रकारांशी संवाद साधताना भाकीत वर्तविले आहे.
Published on

निस्सार शेख | रत्नागिरी : महाप्रबोधन यात्रेत शिवसेना नेत्यांनी जोरदार भाषण केले होते. परंतु, हे भाषण आता वादात सापडले आहे. याप्रकरणी शिवसेनेच्या तीन नेत्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. शिवसेना नेते विनायक राऊत भास्कर जाधव आणि सुषमा अंधारे यांच्यावर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर आज भास्कर जाधव यांनी निखाऱ्यावरून चालताना चटके हे बसणारच, अशी मार्मिक प्रतिक्रिया दिली आहे.

'शिंदे गटाला अस्तित्व टिकवण्यासाठी  भाजपासोबतचं संघर्ष करावा लागेल'
PM मोदींची नक्कल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल; सुषमा अंधारे म्हणाल्या, कायदा माझ्या बापाने लिहलायं

भास्कर जाधव म्हणाले की, निखाऱ्यावरून चालताना चटके हे बसणारच. महाराष्ट्रात पेटलेला वणवा हा भविष्यात असाच वाढत जाईल, असा सूचक इशारा देखील त्यांनी विरोधकांना दिला आहे. तसेच, आपण कोणते चितावणीखोर वक्तव्य केले हे भाषण तपासल्याशिवाय पोलिसांना गुन्हा दाखल करता येत नाही, असेही जाधवांनी यावेळी सांगितले.

शिवसेना पक्षाला मिळालेले मशाल हे चिन्ह निवडणूक आयोगाने दिले असून जर एखाद्या पक्षाला या चिन्हाबाबत आक्षेप असेल तर त्यांनी भारतीय निवडणूक विभागाकडे याबाबत दावा करावा, अशी प्रतिक्रिया भास्कर जाधव यांनी दिली आहे. शिवसेनेला मिळालेले मशाल या चिन्हावर समता पक्षाकडून दावा केला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार भास्कर जाधव यांनी समता पक्षाला हा सल्ला दिला आहे.

'शिंदे गटाला अस्तित्व टिकवण्यासाठी  भाजपासोबतचं संघर्ष करावा लागेल'
उद्धव ठाकरेंच्या मागचं शुक्लकाष्ठ संपेना! मशाल चिन्हावरही 'या' पक्षाने केला दावा

भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांनी आजवर केलेल्या विधानांचा विचार शिंदे गटाने करायला हवा. यानुसार शिंदे गटाला स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी भविष्यात भाजपा सोबतचं संघर्ष करावा लागेल, असे भाकीत भास्कर जाधव यांनी वर्तविले आहे.

दरम्यान, ठाण्यातील टेंभीनाका येथे शिवसेनेच्या ठाकरे गटाची महाप्रबोधन मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात सुषमा अंधारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केली होती. तर भास्कर जाधव यांनी भाजप नेते गिरीष महाजन यांची नक्कल केली होती. यातून बदनामी झाल्याचा आरोप ठेवत त्यांच्यावर ठाण्याच्या नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. यात सुषमा अंधारे, विनायक राऊत भास्कर जाधव, मधुकर देशमुख आणि अनिता बिर्जे यांच्यावर कलम 153, 500 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com