Maharashtra Politics: महाराष्ट्रातील 'या' खासदारांना मंत्रिपदासाठी फोन, कोणाकोणाला मिळणार मंत्रीपद?
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. यावेळची निवडणूक विविध कारणांमुळे चांगलीच चर्चेत राहिली. नरेंद्र मोदींसह आज अनेक मंत्रीही शपथ घेणार आहे. यात महाराष्ट्रातील काही नेत्यांचा समावेश आहे. आज राज्यातील काही नेत्यांना मंत्रिपदासाठी फोन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
आज नरेंद्र मोदी यांच्यासह जवळपास 40-50 खासदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
पियुष गोयल - भाजप
चिराग पासवान -लोकजनशक्ती
एच. डी. कुमारस्वामी - जेडिएस
मनसुख मांडवीय - भाजप
अर्जुनराम मेघवाल - भाजप
ज्योतिरादीत्य शिंदे - भाजप
प्रतापराव जाधव - शिवसेना
रक्षा खडसे - भाजप
डी. आर. चंद्रशेखर - तेलुगू देसम
के. राममोहन नायडू - तेलुगू देसम
जीतन राम मांझी - हिंदुस्थान आवाम मोर्चा
जयंत चौधरी - राष्ट्रीय लोकदल
अनुप्रिया पटेल - अपना दल
सुरेश गोपी - भाजप
सुदेश महतो - ऑल झारखंड स्टुडंट्स युनियन
मनोहर लाल खट्टर - भाजप
रामदास आठवले - रिपाइं
रामनाथ ठाकूर - जनता दल युनायटेड
या सर्व नेत्यांना शपथविधीसाठी फोन आला असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र अजित पवार गटाच्या नेत्यांना अद्याप मंत्रिपदासाठी फोन आला नसल्याची माहिती समोर आले आहे.
नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा राष्ट्रपती भवनात पार पडणार आहे. संध्याकाळी 7:15 वाजता मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. पंडीत नेहरूंनंतर तिसऱ्यांदा पंतप्रधान होणारे मोदी हे पहिले नेते असणार आहेत. या शपथविधीची संपूर्ण तयारी पार पडली आहे.