Devendra Fadnavis | Eknath Shinde
Devendra Fadnavis | Eknath ShindeTeam Lokshahi

भाजपचे नऊ संभाव्य मंत्री, पण मुख्यमंत्र्यांची आहे ही अडचण?

मंत्रिमंडळ विस्ताराच्या विलंबावर विरोधकांचा हल्लाबोल
Published by :
Shubham Tate
Published on

cabinet expansion : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहेत. शिवसेना आमदार एकनाथ शिंदे आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी 30 जून रोजी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राजभवनात दुपारी 12 वाजता होणाऱ्या कार्यक्रमात डझनभर मंत्री शपथ घेणार असल्याचे एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. महाराष्ट्र मंत्रिमंडळातील संभाव्य मंत्र्यांची नावेही समोर आली आहेत. (cabinet expansion Eknath Shinde to be held tomorrow list of maharashtra potential ministers)

भाजपकडून चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, मंगल प्रभात लोढा, किसन कथोरे आणि नितेश राणे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते. दुसरीकडे शिवसेनेकडून दादा भुसे, संदीपान भुमरे, उदय सामंत, गुलाबराव पाटील, संजय शिरसाठ आणि अनिल बाबर यांना मंत्री केले जाऊ शकते.

Devendra Fadnavis | Eknath Shinde
फातिमांवर येणार चित्रपट; दिसणार फाळणीच्या वेदना, कोण आहेत फातिमा जिना

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अडचण काय?

मुख्यमंत्र्यांचे सहाय्यक म्हणाले, "राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन लवकरच होणार आहे, त्यामुळे आम्ही मंत्रिमंडळ विस्तारात 12 आमदारांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी शपथ घेणार्‍यांमध्ये काही विधान परिषदेचे सदस्यही असतील. शिवसेनेत बंडखोरी भूमिका घेत बहुतांश आमदारांना आपल्या गटात आणणाऱ्या शिंदे यांच्यासाठी हे अवघड काम असेल, असे सूत्रांनी सांगितले.

Devendra Fadnavis | Eknath Shinde
2002 च्या गुजरात दंगलीची आठवण करून देत कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांवर नाराजी व्यक्त केली, कारण...

मंत्रिमंडळ विस्ताराच्या विलंबावर विरोधकांनी हल्लाबोल केला

शिंदे यांनी गेल्या महिनाभरात सात वेळा दिल्लीला भेट दिली असून प्रत्येक दौऱ्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराची अटकळ आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या दिरंगाईवरून मुख्यमंत्रीही विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, शिंदे यांनी त्यांच्यासोबत आलेल्या प्रत्येक आमदाराला मंत्रीपद देण्याचे आश्वासन दिले होते. पवार म्हणाले, आता शिंदे यांना दिलेले आश्वासन पूर्ण करता येत नाही, त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब होत आहे. उशीर कशामुळे झाला हेही मुख्यमंत्र्यांनी सांगावे.

मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराचे निमंत्रण अद्यापपर्यंत आपल्याला आलेले नाही, असेही पवार म्हणाले. ते म्हणाले की, शिंदे गटात गेलेल्या शिवसेनेच्या सर्व 40 बंडखोर आमदारांना मंत्रिपद मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com