हरभजन सिंग राज्यसभेचे उमेदवार; ‘AAP’ देणार मोठी जबाबदारी

हरभजन सिंग राज्यसभेचे उमेदवार; ‘AAP’ देणार मोठी जबाबदारी

Published by :
Team Lokshahi
Published on

क्रिकेट (Cricket) जगात प्रसिद्ध असलेल्या हरभजन सिंगला (Harbhajan Singh) आम आदमी पक्षाने राज्यसभेचे उमेदवार केले आहे. या महीन्याच्या अखेरीस आम आदमी पक्षाला राज्यसभेच्या पाच जागा मिळणार आहेत. यामध्ये हरभजन सिंगचे पहिले नाव समोर आले आहे.पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant mann) आणि हरभजन सिंग हे खूप जवळचे मित्र मानले जातात. आता आम आदमी पार्टीच्या हायकमांडने भज्जीच्या नावाला ग्रीन सिग्नल दिला आहे.

निवडणूक प्रचारादरम्यानच भगवंत मान यांनी जाहीर केले होते की, त्यांच्या कार्यकाळात पंजाबमध्ये (Punjab) खेळांना भरपूर प्रोत्साहन दिले जाईल. जालंधरमध्ये (Jalandhar) क्रीडा विद्यापीठ (Sports University) सुरू करण्यात येईल, यावरही भर देण्यात आला. आता मान मुख्यमंत्री (CM) होताच हरभजन सिंग यांना राज्यसभेचे उमेदवार बनवण्यात आले आहे, त्यामुळे त्यांच्याकडे या क्रीडा विद्यापीठाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते, या कामासाठी हरभजन सिंगच्या नावाची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. जेव्हापासून 'आप'ने स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी स्थापन करण्याची चर्चा केली तेव्हापासून भज्जीचे नाव आघाडीवर होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com