'मोदींची गॅरंटी' या नावाने भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध ; जाहीरनाम्यात दिली 'ही' गॅरंटी

'मोदींची गॅरंटी' या नावाने भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध ; जाहीरनाम्यात दिली 'ही' गॅरंटी

भाजपने आज, 14 एप्रिल 2024 रोजी लोकसभा निवडणूक 2024 साठीचा जाहीरनामा जाहीर केला.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

भाजपने आज, 14 एप्रिल 2024 रोजी लोकसभा निवडणूक 2024 साठीचा जाहीरनामा जाहीर केला. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक घोषणा केल्या. भाजपने आपल्या जाहीरनाम्याला 'संकल्प पत्र' असे नाव दिले आहे. दिल्लीतील भाजप मुख्यालयात हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. गेल्या काही महिन्यांपासून उज्ज्वला गॅस योजना आणि सर्वसामान्यांच्या घरगुती गॅस योजनांवर केंद्र सरकारने अनुदान दिले आहे.

'संकल्प पत्र' जारी करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आजचा दिवस शुभ आहे. संपूर्ण देशाला जाहीरनाम्याची प्रतीक्षा होती. 10 वर्षात भाजपने सर्व आश्वासने पूर्ण केली. आमचा फोकस गुंतवणूक ते रोजगारापर्यंत आहे. मोफत राशनची योजना पुढील 5 वर्षे पूर्ण राहणार. 70 वर्षांवरील सर्वांचा आयुष्मान योजनेत समावेश करणार. भारतीयांचं जीवनमान उंचावण्यावर आमचा भर आहे. घराघरापर्यंत मोफत गॅस पोहचवण्याची योजना चालू करणार. देशात गरिबांसाठी 3 कोटी घरं बनवणार. मुद्रा लोनअंतर्गत कर्जाची मर्यादा 20 लाखापर्यंत वाढवणार. कोट्यवधी लोकांचं वीज बील शून्य करण्यासाठी प्रयत्न करणार. तृतीयपथीयांनाही आयुष्मान भारत योजनेत आणणार. 3 कोटी महिलांना लखपती दीदी बनवणार. समाजातील प्रत्येक घटकाला सशक्त बनवणार. महिला खेळाडूंना विशेष सुविधा देणार. लोकांना कमी दरात औषधं मिळावेत यासाठी प्रयत्न करणार. तसेच महिला आरक्षण विधेयक लागू करण्याचं आश्वासन दिलं असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप जाहीरनामा प्रसिद्ध करताना सांगितले.

जाणून घ्या भाजपच्या जाहीरनाम्यातील 'हे' महत्त्वाचे मुद्दे:

1. मोफत राशनची योजना पुढील 5 वर्षे पूर्ण राहणार.

2. देशात गरिबांसाठी 3 कोटी घरं बनवणार.

3. प्रत्येक घराघरापर्यंत मोफत गॅस पोहचवण्याची योजना चालू करणार.

4. कोट्यवधी लोकांचं वीज बील शून्य करण्यासाठी प्रयत्न करणार.

5. 70 वर्षांवरील सर्वांचा आयुष्मान योजनेत समावेश करणार.

6. 3 कोटी महिलांना लखपती दीदी बनवणार.

7. मुद्रा लोनअंतर्गत कर्जाची मर्यादा 20 लाखापर्यंत वाढवणार.

8. लोकांना कमी दरात औषधं मिळावेत यासठी प्रयत्न करणार.

9. महिला खेळाडूंसाठी विशेष सोयी-सुविधा देणार.

10. नॅनो युरियाच्या वापरावर भर देणार.

11. डिजिटल क्षेत्राच्या विस्तारासाठी 5Gचा विस्तार करणार.

12. उत्तर, दक्षिण आणि पूर्व भारतात बुलेट ट्रेन सुरु करणार.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com