उद्यापासून भाजपच्या 'जागर मुंबईचा' यात्रेला होणार सुरवात
राज्यात राजकीय घडामोडींना वेग आलेलं असताना, अशातच आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे. याच महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने मुंबईत प्रचार मोहीम सुरू केली आहे. ‘जागर मुंबईचा’ हे अभियान रविवारपासून (ता.६) भाजपकडून सुरू करण्यात येणार आहे. वांद्रे येथून याची सुरुवात होईल. अशी माहिती भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिली आहे.
या अभियानांबाबत बोलताना शेलार म्हणाले की, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मतांसाठी तुष्टीकरण. महापालिकेतील भ्रष्टाचार आणि परिवारवाद तसेच औरंगजेबी स्वप्न पाहणाऱ्यांची जी भलती "उठा"ठेव सुरु आहे त्या विरोधात भाजपाचे मुंबईकरांसाठी झंझावाती जागर सुरू होत आहे. या मुंबईच्या जागराला वांद्रे पूर्व येथूच सुरुवात होणार, मुंबईचा संभाव्य धोका टाळण्यासाठी मुंबईकरांनी या अभियानात सहभागी व्हावे हे मुंबईकरांचे जागर आहे, असे आव्हान आशिष शेलार यांनी केले आहे.
उद्या वांद्रे पूर्व येथे गव्हर्नमेंट काँलनीतील पी.डब्ल्यू.डी मैदानात संध्याकाळी 6 वाजता होणार आहे. या यात्रेची सुरुवात उद्या वांद्रे पूर्व येथील गव्हर्मेंट कॉलनी मधून होईल. पहिल्या दिवशी आशिष शेलार आणि पुनम महाजन यांच्या सभेने या अभियानाची सुरुवात होणार आहे. आमदार अँड पराग अळवणी यांच्यासह मुंबईचे पदाधिकारी यावेळी उपस्थितीत राहणार आहेत. त्यानंतर 7 नोव्हेंबरला अंधेरी पूर्व येथे सभा होणार असून विशेष म्हणजे अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचा निकाल रविवारी लागताच दुसऱ्याच दिवशी याच मतदार संघात भाजपाने सभा ठेवली आहे.