नाशिकमधील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपची बाजी; मिळवल्या सर्वाधिक जागा

नाशिकमधील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपची बाजी; मिळवल्या सर्वाधिक जागा

भाजपने सर्वाधिक जागा मिळवल्या, नाशिक जिल्ह्यातील 36 ग्रामपंचायतीचे निकालाचे चित्रही स्पष्ट
Published by :
Team Lokshahi
Published on

नाशिक : सर्व राज्याचे लागून असलेल्या 238 ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर झाला असून नाशिक जिल्ह्यातील 36 ग्रामपंचायतीचे निकालाचे चित्रही स्पष्ट झाले आहे. नाशिक जिल्ह्यात भाजपने ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकत सत्ता काबीज केली असून राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर ग्रामपंचायत निवडणुकांत विजयी झालेल्या अपक्ष उमेदवारांची संख्या जास्त आहे. विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्यात काँग्रेसला भोपळाही फोडता आलेला नाही.

राज्यभरात राज्यातील विविध 15 जिल्ह्यांतील 62 तालुक्यातील 238 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. या सर्व ग्रामपंचायतींमध्ये काळ निवडणूक मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानुसार राज्यभरात 78 टक्के मतदान झाले. यानंतर सर्वच उमेदवारांना निकालाची उत्सुकता होती. त्यानुसार राज्यातील सर्वच ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल लागला असून अनेक ठिकाणी भाजपाची सत्ता आली आहे.

नाशिक जिल्ह्यातील 40 ग्रामपंचायती निवडणुकीचा बिगुल वाजला होता. यामध्ये बागलान 13, निफाड 01, सिन्नर 02, येवला 04, चांदवड 01, देवळा 13, नांदगाव 06 ग्रामपंचायतीचा समावेश होता. या सर्व 40 ग्रामपंचायतीचे चित्र स्पष्ट झाले असून जिल्ह्यातर सर्वाधिक जागा या भाजपने मिळवल्या आहेत. त्या खालोखाल सर्वाधिक 10 अपक्ष उमेदवारांनी गड राखला आहे. त्यानंतर राष्ट्रवादी तिसऱ्या, त्यांनंतर अनुक्रमे शिंदे गट, प्रहार आणि शिवसेना पक्षाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. तर काँग्रेस पक्षाला भोपळाही फोडता आला नाही.

नाशिक जिल्हा - 40 ग्रामपंचायत निकाल

निफाड - राष्ट्रवादी 1

येवला - राष्ट्रवादी 2, भाजप 1, ईतर 1

सिन्नर - राष्ट्रवादी 1, शिवसेना 1

देवळा - भाजप 9, प्रहार 1, ईतर 3

बागलाण - भाजप 5, राष्ट्रवादी 5, ईतर 3

नांदगाव - ईतर 3, शिंदे गट 3

चांदवड - 1 प्रहार

असा आहे निकाल

निफाड तालुक्यातील जळगाव ग्रामपंचायत मध्ये राष्ट्रवादी, येवला - राष्ट्रवादी 2, भाजप 1, ईतर 1, सिन्नर - राष्ट्रवादी 1, शिवसेना 1, देवळा - भाजप 9, प्रहार 1, ईतर 3, बागलाण - भाजप 5, राष्ट्रवादी 5, ईतर 3, नांदगाव - ईतर 3, शिंदे गट 3, चांदवड - 1 प्रहार असा निकाल आहे. तर पक्षाच्या दृष्टीने निकाल असा आहे. राष्ट्रवादी - 9, भाजप - 15, शिवसेना - 1, शिंदे गट - 3, ईतर - 10, प्रहार - 2 असा आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com