Video | बंगाल विधानसभेत भाजप-टीएमसी आमदारांत जोरदार राडा, नेमकं काय घडलं?

Video | बंगाल विधानसभेत भाजप-टीएमसी आमदारांत जोरदार राडा, नेमकं काय घडलं?

Published by :
Shweta Chavan-Zagade
Published on

बंगाल विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे.  पश्चिम बंगाल विधानसभेत (Bengal Assembly) जोरदार राडा झाला असून भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या आमदारांमध्ये जोरदार हाणामारी झालीय. मिळालेल्या अधिक माहितीनुसार, बंगाल विधानसभेत भाजप आमदार मनोज तिग्गा (Manoj Tigga) आणि टीएमसी (TMC) आमदार असित मजुमदार (Asit Majumdar) यांच्यात जोरदार हाणामारी झाली. या भांडणात असित मजुमदार जखमी झाले असून या प्रकरणी पाच आमदारांचं निलंबन झाल्याचं कळतंय.

भाजप आमदार मनोज तिग्गा यांनी विधानसभेच्या बाहेर निदर्शनादरम्यान सांगितलं की, टीएमसी आमदारांनी मला धक्काबुक्की करुन मारहाण केलीय. शिवाय, या भांडणात माझा शर्टही फाडण्यात आलाय, असं त्यांनी सांगितलं. यानंतर भाजपचे आमदार आणि बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांनी विधानसभेबाहेर घोषणाबाजी करण्यास सुरुवात केलीय. या प्रकरणानंतर भाजप कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं दिसतंय.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com