नाचे कुठले, न्यायालयाच्या निर्णयानंतर राणेंची शिवसेनेवर बोचरी टीका
महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात प्रचंड गोंधळ सुरु आहे. त्यातच शिवसेना आणि शिंदे गटात दसरा मेळाव्यावरून जोरदार वाद सुरु होता. या मेळाव्याबाबत आज निणर्य दिला आहे. हायकोर्टाने दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कचं मैदान ठाकरे गटालाच देण्याचा निर्णय घेतला आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर शिवसेनेच्या गोटात मोठे जल्लोषाचे आणि आनंदाचं वातावरण निर्माण झाले आहे. त्यावरच आता भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर विखारी टीका केली आहे.
काय म्हणाले नितेश राणे?
न्यायालयाच्या या निर्णयानंतर शिवसेनेच्या गोटात मोठे जल्लोषाचे आणि आनंदाचं वातावरण आहे. अनेक ठिकाणी शिवसेनेकडून जोरदार जल्लोष साजरा केला जात आहे. ढोल, ताशाच्या गजरात शिवसैनिकांकडून आनंद साजरा केला जात आहे. त्यावरच नितेश राणे यांनी ट्विट करत शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे. त्यांनी लिहले की, फक्त मैदानावर सभा घेण्याची परवानगीच मिळाली ना ?? मला वाटलं आदित्यच लग्न मुलीशी जमलं म्हणून जल्लोष करत असतील नाचे कुठले !! अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे.