बापाची जहागिरदारी असल्याप्रमाणे वागले, पडळकरांची जयंत पाटलांवर विखारी टीका
राज्यात सध्या अभूतपूर्व गोंधळ सुरु आहे. अनेक वेगवेगळ्या वादावरून आरोप- प्रत्यारोप सुरु असताना. भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर विखारी टीका केली आहे. सांगलीत माध्यमांशी बोलत असताना त्यांनी ही टीका केली. सोबतच सांगलीत ते दसरा मेळावा घेणार असल्याची माहिती पडळकर यांनी यावेळी दिली.
सत्ते बाहेर हद्दपार झाले
विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर टीका केली आहे. “जयंत पाटलांच्या मनात प्रचंड भीती होती. काहीतरी बाहेर येईल. काही तर बोललं जाईल, असं त्यांना वाटत होतं. सांगली जिल्हाधिकारी कार्यालय आपल्या बापाची जहागिरदारी असल्याप्रमाणे जयंत पाटील वागले. जिल्हा नियोजन बैठकीला माझ्याप्रमाणे विधान परिषद आमदारांना जयंत पाटील बोलवत नव्हते. त्यांना इतका सत्तेचा माज होता, एवढा माज चांगला नसतो”, त्यांनी माझ्या भावला हद्दपारीची नोटीस दिली होती. आता तेच सत्ते बाहेर हद्दपार झाले आहे. त्यांनी सत्तेचा गैरवापर केला. त्यांना वाटलं आम्ही शरण येऊ आपण असं होणार नाही. आम्ही संघर्ष करणारे आहोत. अशी जोरदार टीका पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर यावेळी बोलताना केली.
2 ऑक्टोबरला आरेवाडीत दसरा मेळावा
सांगली जिल्ह्यातील आरेवाडीमध्ये आपण मेळावा घेणार असल्याचं गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं आहे. 2 ऑक्टोबरला आरेवाडीत दसरा मेळावा घेणार आहे. धनगर समाजाचे आराध्या दैवत असलेल्या आरेवाडीमध्ये मेळावा होणार आहे. धनगर समाजाचे प्रश्न आणि अडचणींवर या मेळाव्यात चर्चा होणार आहे, असे यावेळी पडळकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.