Atul Bhatkhalkar
Atul BhatkhalkarTeam Lokshahi

काँग्रेसने देशाची माफी मागावी; का केली भातखळकरांनी अशी मागणी?

हा तुम्ही केलेला तिरंग्याचा सन्मान होय रे गुलामांनो. काँग्रेसने देशाची माफी मागावी.
Published by :
Sagar Pradhan
Published on

काँग्रेस नेते राहुल गांधीं यांच्या नेत्तृत्वात पाच महिन्यांपासून सुरु असलेल्या भारत जोडो यात्रेचा आज श्रीनगरमध्ये समारोप झाला. श्रीनगरच्या शेर-ए- कश्मीर मैदानात सभा घेऊन यात्रेचा समारोप झाला. त्याआधी काल काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय ध्वज फडकवन्यात आला. मात्र, याच कार्यक्रमात राहुल गांधी यांचे मोठे कट आऊट लावण्यात आले होते. याच कट आऊटवर आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी आक्षेप घेतला आहे.

Atul Bhatkhalkar
चंद्रकांत पाटलांची महात्मा फुलेंसोबत तुलना; चित्रा वाघ यांचे स्पष्टीकरण, म्हणाल्या मला आश्चर्य...

काय म्हणाले अतुल भातखळकर?

राहुल गांधी यांनी काल श्रीनगरमध्ये भारत जोडो यात्रेचा समारोप केला. यावेळी त्यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. याच कार्यक्रमात राष्ट्रध्वजापेक्षा मोठा राहुल गांधींचा फोटो होता. त्यावरच बोलताना भातखळकर यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, तिरंग्यापेक्षा राहुल गांधींचा कट आऊट मोठा. हा तुम्ही केलेला तिरंग्याचा सन्मान होय रे गुलामांनो. काँग्रेसने देशाची माफी मागावी. अशी मागणी केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com