अजित पवारांच्या विधानावर बावनकुळे आक्रमक; म्हणाले, settlement करणाऱ्यांना...
राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच एकापाठोपाठ एक वादग्रस्त विधानांचे सत्र राजकीय मंडळींकडून सुरु आहे. याच दरम्यान काल हिवाळी अधिवेशनात विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल एक विधान केले होते. त्या विधानावरून सध्या प्रचंड वादंग निर्माण झाले आहे. भाजप नेते या विधानामुळे प्रचंड आक्रमक झाले आहे. त्यातच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या विधानाला उत्तर दिले आहे.
काय आहे बावनकुळेंच्या ट्विटमध्ये?
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या विधानाला बावनकुळे यांनी ट्विटरवरून उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, अजितदादा, आपल्या स्वार्थासाठी सर्व ठिकाणी settlement करणाऱ्यांना काय कळणार धर्मासाठी त्याग काय असतो ते ?होय #धर्मवीरच ! छञपती धर्मवीर संभाजी महाराजांना मानाचा मुजरा. असे बावनकुळे यावेळी म्हणाले आहे.
काय म्हणले होते अजित पवार?
महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धेला खतपाणई घातलं जात नाही. बाल शौर्य पुस्कार हा किमान स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करावी. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते, धर्मवीर नव्हते. त्यांनी कधीच धर्माचा पुरस्कार केला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. पण काहीजण जाणीवपूर्वक धर्मवीर उल्लेख करतात. मी मंत्रिमंडळात असतानाही त्यावेळी स्पष्ट सांगितलं होतं, संभाजी महाराजांचा उल्लेख हा स्वराज्यरक्षक असाच करावा, असे अजित पवार कल म्हणाले होते.