Rajan Teli : भाजप नेते राजन तेली आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार

Rajan Teli : भाजप नेते राजन तेली आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार

निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद घेत आहेत. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या.

यातच आता भाजपला मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार तथा भाजप माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे.

उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत हा प्रवेश होणार असून संध्याकाळी 5 वाजता 'मातोश्री'वर पक्षप्रवेश होईल. दिपक केसरकर यांचे कट्टर विरोधक राजन तेली सावंतवाडी मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com