Aditya Thackeray | Nilesh Rane
Aditya Thackeray | Nilesh RaneTeam Lokshahi

निलेश राणेंनी आदित्य ठाकरेंना पुन्हा डिवचले; म्हणाले, कोण कुत्र...

महाराष्ट्रातील निवडणुका होऊन जाऊन द्या असे विधान केले होते. त्यालाच उत्तर देताना आता भाजप नेते निलेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर बोचरी टीका
Published by :
Sagar Pradhan
Published on

काल गुजरात आणि हिमाचल विधानसभा निवडणुकांचा निकाल पार पडला. या निवडणुकीत हिमाचलमध्ये भाजपचा पराभव झाला पण गुजरातमध्ये भाजपने मोठा विजय प्राप्त केला. या निवडणुकीवर सर्वांचे लक्ष लागलेले होते. देशभरातून राजकीय मंडळी यावर प्रतिक्रिया देत होते. याच पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्रातील निवडणुका होऊन जाऊन द्या असे विधान केले होते. त्यालाच उत्तर देताना आता भाजप नेते निलेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे.

Aditya Thackeray | Nilesh Rane
छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव जरी घेतले तरी दिल्लीला त्रास व्हायला लागला : जयंत पाटील

काय म्हणाले निलेश राणे?

आदित्य ठाकरेंच्या प्रतिक्रियेला राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. त्यावेळी ते म्हणाले की, अरे चम्या तुझं कोण कुत्र तरी ऐकतो का?? रोज उठून तू बेअक्कल आहेस ते दाखवू नको, जर तुला खरंच वाटत असेल निवडणुका व्हाव्यात तर जा कोर्टात आणि बघ कोर्टातून काय उत्तर येतं. अश्या शब्दात निलेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे.

काय म्हणाले होते आदित्य ठाकरे?

“गुजरात, हिमाचल मधील विजयी उमेदवारांचे मी अभिनंदन करतो. आतातरी महाराष्ट्राच्या निवडणुका लावाव्यात. मुंबई, ठाणे, पुणे आणि अन्य महापालिकांच्या निवडणुका बाकी आहेत. तसेच, महाराष्ट्रातही आता लोकशाही पद्धतीने निवडणुका होऊन द्या. असे अदित्य ठाकरे म्हणाले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com