खडसेंना अहंकार जास्त झाला होता? का म्हणाले महाजन असे?
राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच दुसरीकडे जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांना मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांचे समर्थक संजय पवार यांची जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. याच परभावानंतर भाजप नेते गिरीश महाजन यांची खडसेंवर जोरदार टीका केली आहे.
काय म्हणाले गिरीश महाजन?
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत एकनाथ खडसे यांचा पराभव झाल्यानंतर गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, माणूस हवेत उडायला लागला की, तो जोरात खाली आपटतो. सर्व ठिकाणी मी हा एकनाथ खडसे यांचा अहंकार जास्त झाला होता तो अहंकार आजच्या निवडणुकीत उतरवला. बाहुबली असा उल्लेख करत बाहुबली म्हणून घेणाऱ्या एकनाथ खडसे यांना आम्ही जागा दाखवून दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या रेसमध्ये असणारे खडसे आज कुठे येऊन पडलेत. असा टोला त्यांनी लगावला आहे.
पुढे त्यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर झालेल्या ईडीच्या कारवाईवर देखील भाष्य केले आहे. ते म्हणाले की, हसन मुश्रीफ यांच्या प्रकरणात तथ्य असल्यानेच इडी कडून त्यांच्यावर कारवाई आहे. तुम्ही जे पाप केलं ते तुम्हाला भरावेच लागणार. तुमच्या सभा झाल्या म्हणजे ईडी कारवाई करणार नाही का? तुमच्या सभेमुळे तुमच्या सर्व भ्रष्टाचारांवर पांघरून घालणार का? असा सवाल त्यांनी यावेळी केला. ईडीची कार्यवाही ही नियमाने यात कुठलाही राजकीय हस्तक्षेप नाही. ज्यांनी या राज्याला लुटलं त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई होणार. असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.