Chitra Wagh On Sanjay Raut
Chitra Wagh On Sanjay RautTeam Lokshahi

Sanjay Raut: 'सर्वज्ञानी कंपाऊंडर विश्रांतीची गरज' राऊतांवर भाजप नेत्याची टीका

Chitra Wagh On Sanjay Raut: मणिपूरमधील हिंसाचारावरून संजय राऊत यांनी टीका केली होती. त्याच टीकेवर आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उत्तर दिले आहे.
Published by :
Sagar Pradhan
Published on

मुंबई : राज्यात मागील काही दिवसांमध्ये विविध ठिकाणी दंगली, राडा अशा घटना घडल्या. त्यानंतर आता मणिपूरमध्ये देखील पुन्हा हिंसाचार उसळला. त्यावरूनच शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली. सरकारला हवे तरी काय? मणिपूरला काश्मीर बनवायचे आहे का? असा सवाल त्यांनी केला. त्यावरच आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राऊतांवर पलटवार केला.

Chitra Wagh On Sanjay Raut
Shrikant Shinde: 'उगाच वेगळं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू' भाजप- शिवसेना वादावर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया

काय केला चित्रा वाघ यांनी पलटवार?

राऊतांच्या टीकेवर उत्तर देताना चित्रा वाघ म्हणाल्या की, राऊत हे 103 दिवस जेलमध्ये राहून आलेत त्यामुळे त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. तर त्यांना काविळ झाल्यागत सगळ पिवळ दिसत आहे. त्यामुळे ते असे बोलत आहेत. यामुळे आता सर्वज्ञानी कंपाऊंडर विश्रांतीची गरज आहे. असा जोरदार टोला त्यांनी राऊतांना लगावला.

काय केली होती राऊतांनी टीका?

मणिपूरमधील हिंसाचारावर बोलताना राऊत म्हणाले होती की, मणिपूरमध्ये केंद्रीय मंत्र्यांचे घर जाळले जाळण्याचा प्रयत्न झाला. तर लाखो लोक पलायन करत आहेत. मात्र सरकारकडून कारवाई होत नाही. सरकारला हवे तरी काय? मणिपूरला काश्मीर बनवायचे आहे का? तसेच हे सर्व केंद्रीय गृहमंत्रालयाचे अपयश आहे. तर अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का? तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कुठे आहेत? असा सवाल त्यांनी केला होता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com