Chandrakant Patil
Chandrakant PatilTeam Lokshahi

चंद्रकांत पाटलांचे वादग्रस्त विधान; म्हणाले, डॉ. आंबेडकर, महात्मा फुले यांनी शाळा सुरू करण्यासाठी भीक मागितली

पैठण येथील कार्यक्रमात बोलत असताना चंद्रकांत पाटलांचे वादग्रस्त विधान, मोठा वाद होण्याची शक्यता.
Published by :
Sagar Pradhan
Published on

राज्यात अभूतपूर्व गोंधळ सुरु आहे. त्यातच राजकीय मंडळींकडून वादग्रस्त विधानांचे सत्र सुरु आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल विधान केल्यानंतर भाजप नेते मंगलप्रभात लोढा आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांनी देखील वादग्रस्त विधान केले होते. या वाद अद्यापही शांत झालेला नाही. त्यातच आता पैठण मधील एका कार्यक्रमात बोलत असताना भाजप मंत्री चंद्रकांत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एक मोठा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Chandrakant Patil
ठरलं! 'या' तारखेला अमित शाह घेणार महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भेट

नेमकं काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

पैठण येथील कार्यक्रमात बोलत असताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, त्या काळात सरकार शाळांसाठी अनुदान देत नव्हते. तरीसुद्धा महापुरुषांना शाळा उघडल्या केल्या. मात्र, आता लोकं शाळांच्या अनुदानासाठी सरकारवर अवलंबून राहतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरू केल्या. या शाळा सुरू करताना सरकारनं त्यांना अनुदान दिलं नाही. त्यांनी लोकांकडं भीक मागितली. असं म्हणताना चंद्रकांत पाटील यांनी गळ्यातलं मफलर पुढे केले. ते म्हणायचे मला पैसे द्या. त्या काळात दहा रुपये देणारे होते. आता दहा कोटी रुपये देणारे आहेत. सीएसआरच्या माध्यमातून कंपन्यांच्या नफ्यातून दोन टक्के खर्च करण्यासाठी कायदा झाला आहे. असे चंद्रकांत पाटील यावेळी बोलताना म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com