सत्तारांनी सुळेंवर केलेल्या वादग्रस्त विधानावर पंकजा मुंडेंनी शिंदे गटाला सुनावले
राज्यात शिंदे- फडणवीस सरकार आल्यापासून सरकार मधील मंत्री आणि नेते विविध कारणाने नेहमी चर्चेत असतात. विशेष म्हणजे कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे मागील काही काळापासून आपल्या विधानाने चांगलेच चर्चेत येत आहे. परंतु आता मंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल खळबळजनक वक्तव्य केले आहे. शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांची आज सिल्लोडमध्ये सभा आहे. त्याची पाहणी करत असताना लोकशाहीशी बोलत असताना त्यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे. त्यावरच आता भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांना सुनावले आहे.
काय म्हणाले पंकजा मुंडे?
माध्यमांशी बोलत असताना पंकजा मुंडे यांना सत्तारांच्या विधानावर प्रश्न विचारला असता त्यावर त्या म्हणाल्या की, मी मंत्री महोदयांचे वक्तव्य ऐकले नाही पण राजकारणात कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही महिलेविषयी सन्मानपूर्वक, आदरपूर्वक भाष्य केले पाहिजे. महिलाच नाही तर पुरुषांबद्दल देखील भान ठेवून टीका केली पाहिजे. सोबतच बोलत असताना त्यांनी मीडियाला सुद्धा कुठल्याही व्यक्तीने काही बोलले तर भांडवल नाही केले पाहिजे. असे त्यांनी मीडियाला मागणी केली आहे.
काय केले होते सत्तारांनी वादग्रस्त विधान
सुप्रिया सुळेंनी 50 खोके मिळाले का, असा प्रश्न अब्दुल सत्तारांना केला होता. यावर सत्तारांनी तुम्हालाही द्यायचे का, असा प्रतिप्रश्न केला होता. सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर देत तुमच्याकडे असल्यानेच तुम्ही ऑफर करत असल्याची टीका केली होती. तर, सत्तारांनी इतकी भि***ट झाली असेल तिलाही देऊ, अशा शब्दात उत्तर दिले.