कर्नाटकमध्ये भाजपचा पराभव; पंतप्रधान मोदींने केले काँग्रेसचे कौतुक
कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल आता जवळपास स्पष्ट झाला आहे. या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष होते. या निवडणुकीत 224 पैकी 136 जागांवर आघाडी मिळवत कर्नाटकात सत्ता काबीज केली आहे. तर दुसरीकडे भाजपचा या निवडणुकीत दारूण पराभव झाला. निवडणुकीतील या विजयानंतर देशभरात काँग्रेसकडून जल्लोष साजरा केला जात आहे. यावरच अनेक राजकीय नेत्यांची प्रतिक्रिया देत असताना आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
कर्नाटक निवडणुकीवर पंतप्रधान मोदींनी ट्विटच्या माध्यमातून भाष्य केले आहे. याबाबत त्यांनी दोन ट्विट केले आहे. पहिल्या ट्विटमध्ये त्यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील यशाबद्दल पंतप्रधान मोदींनी काँग्रेसचं कौतुक केलं आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या विजयाबद्दल त्यांचं अभिनंदन आणि लोकांच्या अपेक्षा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी माझ्या त्यांना शुभेच्छा! असे ते म्हणाले.
पुढच्या ट्विटमध्ये त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांचे देखील कौतुक केले आहे. ते म्हणाले की,कर्नाटक निवडणुकीत ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिला त्या सर्वांचे मी आभार मानतो. मी भाजप कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे कौतुक करतो. आगामी काळात आम्ही कर्नाटकची सेवा आणखी जोमाने करू. असे पंतप्रधान मोदी म्हणाले.