Andheri BJP
Andheri BJP Team Lokshahi

अंधेरी पोटनिवडणुकीसाठी भाजप उमेदवार गुरुवारी दाखल करणार उमेदवारी अर्ज

अंधेरीची जागा शिंदे गट लढवणार की भाजप हे अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी भाजपचे मुरजी पटेल उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत
Published by :
Sagar Pradhan
Published on

राज्यात शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर शिवसेना आणि शिंदे गटात जोरदार वाद सुरु आहे. अशातच काल निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटाला नवे नाव दिले आहे. नावासोबतच दोन्ही गटाला चिन्ह देखील देण्यात आले आहे. या नावाच्या पेचाआधी आयोगाने अंधेरी पूर्व मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर केली होती. त्यामुळे बंडखोरीनंतर ही पहिली निवडणूक असल्यामुळे दोन्ही गट आता नव्या नावाने, चिन्हाने या निवडणुकीला सामोरे जाणार आहे. दरम्यान, ठाकरे गटाच्या उमदेवाराची धोक्यात असताना हा गोंधळ सुरु असतानाच अंधेरी पूर्वचे भाजप उमेदवार मुरजी पटेल गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. अशी माहिती समोर आली आहे.

Andheri BJP
ऋतुजा लटकेंचा राजीनामा नामंजूर; पालिकेविरोधात आता उच्च न्यायालयात धाव

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार नेते मुरजी पटेल गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. उद्या सकाळी 9 वाजता शेरे-पंजाब ग्राउंडमधून आपल्या पंधरा ते वीस हजार समर्थकांच्या सोबत ते उमेदवारी अर्ज भरायला जाणार आहेत. निवडणूक लढवण्याची सूचना आली तर लढणार, नाहीतर पक्षादेश असेल माघार घेणार अशी प्रतिक्रिया एका वृत्तवाहिनीला बोलताना दिली आहे.

यावेळी ते बोलताना म्हणाले की, "मी पक्षादेश पाळणारा कार्यकर्ता आहे. निवडणूक लढवण्याच्या सूचना आल्या तर लढणार नाहीतर पक्षादेश असेल माघार घेणार. देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यावर पक्षाची अधिकृत भूमिका मांडतील." अशी माहिती पटेल यांनी दिली आहे.

Andheri BJP
यंदा रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, केंद्र सरकारकडून बोनसची घोषणा

2019ला अंधेरी पूर्वमध्ये मुरजी पटेल यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती

2019 मध्ये विधानसभेची जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्यावर मुरजी पटेल यांनी अपक्ष ही निवडणूक लढवली. 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत अंधेरी पूर्व मतदारसंघात जवळपास 1 लाख 47 हजार 117 मतदान झाले होते. त्यापैकी रमेश लटके यांना 62 हजार 773 मतं मिळाली. तर मुरजी पटेल यांना 45 हजार 808 मतं होती. 2020 मध्ये मुरजी पटेल यांची भाजपच्या मुंबई उत्तर पश्चिम जिल्ह्याच्या महामंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com