bjp bihar | tejashwi yadav
bjp bihar | tejashwi yadav team lokshahi

जो घाबरेल त्याला घाबरवलं, जो विकला त्याला खरेदी केलं, तेजस्वी यादवांचा शिंदे गटाला इशारा

बेरोजगाराची चर्चा सर्वत्र होत आहे, मात्र या भाजपला त्याचे काही देणेघेणे नाही
Published by :
Shubham Tate
Published on

tejashwi yadav : भाजपाच्या विरोधात आम्ही बिहारमधून सुरुवात केली आहे, आता आम्ही आणि नीतीश कुमार एकत्रित आहोत, सगळ्या विरोधी पक्षांनी आता एकत्रित बसण्याची वेळ आली आहे, असे आवाहनही त्यांनी विरोधी पक्षांना केलं आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही भेट घेतली आहे. तेजस्वी यादव यांनी दिल्लीत पोहोचून भाजपवर जोरदार हल्ला चढवला. भाजपनं महाराष्ट्र , झारखंड, राज्यात प्रादेशिक पक्षाचं काय केलं बघितलं, जो घाबरेल त्याला त्याला ईडीचा धाक दाखवून घाबरवलं आणि जो खरेदी करता येईल त्याला खरेदी केलं, पण बिहारी विकला जाणारा नाही, असे म्हणत शिंदे गटालाही टोला गवाला आहे. (bjp bihar did it give 19 jobs deputy cm tejashwi yadav)

bjp bihar | tejashwi yadav
India Trade Deficit : भारताची तिजोरी रिकामी होतेय, रशिया-चीनसह या 5 देशांसोबतचा व्यापारात 'तोट्याचा सौदा'

बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी शुक्रवारी सांगितले की, भाजपने राज्यात 19 लाख नोकऱ्या देण्याचे बोलले होते, त्यांनीही 19 नोकऱ्या दिल्या का? तसेच देशात 2 कोटी नोकऱ्या देण्याचे बोलायचे पण 80 लाख नोकऱ्या दिल्या. त्यांनी सांगितले की एक संपादित व्हिडिओ प्ले केला होता. त्या नोकऱ्या आणि विशेष पॅकेजबद्दल पंतप्रधान मोदींना विचारण्याचे धाडस गिरिराज सिंह यांनी केले पाहिजे. ज्याचे आश्वासन त्यांनी बिहारला दिले होते. भाजप हा लबाडांचा पक्ष आहे, ते मीडियासमोर बसतात, काय काम करतात?

bjp bihar | tejashwi yadav
दहशतवाद्याला अटक, नुपूर शर्मांना मारण्याचा होता प्लॅन

10 लाख तरुणांना नोकऱ्या देण्याच्या पूर्वीच्या आश्वासनावरून तेजस्वी यादव आणि केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांच्यात शुक्रवारी ट्विटरवरून शाब्दिक युद्ध सुरू झाले. सिंह यांनी तेजस्वीच्या नुकत्याच दिलेल्या मुलाखतीचा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ते बिहारमधील तरुणांना 10 लाख नोकऱ्या देण्यासंबंधीच्या प्रश्नाचे उत्तर देत आहेत. तेजस्वीची खिल्ली उडवत केंद्रीय मंत्र्यांनी व्हिडिओसोबत असेही लिहिले की, राजदच्या नेत्याने 10 लाख नोकऱ्यांचे आश्वासन दिले होते, पण ते मुख्यमंत्री झाले तर ते पूर्ण करू, आता ते उपमुख्यमंत्री आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com