राजकारण
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी घेतला आरक्षणासंदर्भात मोठा निर्णय
आरक्षणाचा मुद्दा बिहारमध्ये देखिल सुरु झाला आहे.
आरक्षणाचा मुद्दा बिहारमध्ये देखिल सुरु झाला आहे. याच पार्श्वभूमीवर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मंत्रिमंडळाची विशेष बैठक बोलावली. सध्या आरक्षणाची मर्यादा 50% आहे. ही आरक्षण मर्यादा वाढवून 65% करण्यासंदर्भात हा प्रस्ताव आहे. या बैठकीत आरक्षणाची व्याप्ती वाढवण्यावर चर्चा करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
महाराष्ट्रातही आरक्षणाची मर्यादा वाढवली जावी, अशी मागणी होत आहे. या प्रस्ताव उद्या (9 नोव्हेंबर) विधिमंडळ अधिवेशनात नितीश कुमार सरकार मांडणार असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मागास लोकांना 10% आरक्षण असं एकूण 75% आरक्षणाची मर्यादा वाढवली जावी. असा प्रस्तावात उल्लेख करण्यात आले आहे. त्यामुळे आता 50 वरून 65 पर्यंत ही मर्यादा वाढवली जाऊ शकते.