Devendra Fadnavis: लाडकी बहिण योजनेच्या निधीविषयी मोठी अपडेट! देवेंद्र फडणवीस म्हणाले...

Devendra Fadnavis: लाडकी बहिण योजनेच्या निधीविषयी मोठी अपडेट! देवेंद्र फडणवीस म्हणाले...

सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाणार आहेत आणि काळजी करु नका आम्ही मार्चपर्यंतचे सगळे पैसे ठेवले आहेत.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सांगितलं विकसित भारत तयार करायचा आहे. पण मोदीजींनी सांगितलं भारत जर विकसित करायचा असेल तर आपल्याला भारताची 50 टक्के लोकसंख्या असलेल्या आमच्या ज्या महिला आहेत, माता आहेत, भगिणी आहेत, मुली आहेत यांचा विकास करावा लागेल. जेव्हा महिला विकासाच्या केंद्रीकरणात येतील, आर्थिक विकासाच्या समावेशनात येतील त्याच वेळी देश विकसित होऊ शकतो आणि म्हणून माननीय मोदीजींनी बेटी बचाओ, बेटी पढाओपासून लखपती दीदीपर्यंतचे कार्यक्रम सुरु केले. या महाराष्ट्रामध्ये परवाच जळगावला 11 लाख लखपती दीदींचा सत्कार आम्ही केला ज्या आपल्या सारख्याच सामान्य गृहीणी होत्या पण कोणी वर्षाला 2 लाख, कोणी 4 लाख, कोणी 8 लाख कमवतायेत मोदीजींच्या लखपती दीदी अंतर्गत आणि आम्ही त्यादिवशी निर्धार केला महाराष्ट्रामध्ये किमान 1 कोटी बहिणींना येत्या काळामध्ये लखपती दीदी बनवायचं म्हणजे 1 कोटी महाराष्ट्रातल्या आमच्या बहिणी अशा असतील ज्या वर्षाला 1 लाखाच्या वर पैसा त्याठिकाणी कमवतील. त्यांना अशा संधी या माननीय मोदीजींच्या नेतृत्वात आपण उपलब्ध करुन देणार आहोत आणि जे मोदीजींनी सांगितलं तेच या महाराष्ट्रामध्ये आमचे मुख्यमंत्री शिंदेजी यांच्या नेतृत्वात आम्ही सुरु केलं असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महिलांच्या सशक्तीकरणाकरिता त्याठिकाणी आपण केल लाडकीसारखी योजना आणली. खरी मुलगी जन्माला आली तर मुलीच्या जन्माचे स्वागत झाले पाहिजे. जन्माला आली की पाच हजार, पहिल्या वर्गात गेली की पाच हजार, चौथ्या वर्गात गेली की सात हजार, सातव्या वर्गात गेली की सात हजार असं करत करत मुलगी 18 वर्षाची होईल तेव्हा तिला 1 लाख रुपये सरकारच्या वतीने देण्याचा निर्णय आपण केला. आज लेक लाडकीसारखी योजना या महाराष्ट्रामध्ये आपण सुरु केली. त्याचसोबत एसटीमध्ये आमच्या महिलांना मोपत प्रवास आपण सुरु केला. भगिणींनो जेव्हा एसटीचा मोफत प्रवास सुरु केला एसटीचे लोक मुख्यमंत्री आणि आमच्याकडे आले म्हणाले आमची एसटी तोट्यात जाईल पण आम्ही सांगितलं नाही हे तर करावचं लागेल. काही दिवसांनी तेच लोकं आले म्हणाले इतकी चांगली योजना तुम्ही आणली इतक्या महिला प्रवास करतायेत आमची एसटी फायदामध्ये आली असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

एवढेच नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना देशातील क्रांतीकारी योजना महाराष्ट्रात सुरु झाली. आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाणं सुरु झालं. योजना माननीय मुख्यमंत्र्यांनी जेव्हा घोषित केली त्यावेळी आमचे विरोधक म्हणाले ही फसवी आहे हा जुमला आहे हे जाणार नाही आतापर्यंत 1 कोटी 60 लाख खात्यात गेले आणि आता 2 कोटींच्या वर खात्यामध्ये पैसै चालले आहे. सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाणार आहेत आणि काळजी करु नका आम्ही मार्चपर्यंतचे सगळे पैसे ठेवले आहेत. तुमच्या आर्शीवादाने मार्चमध्ये पुन्हा बजेट मांडू. पुढच्या त्याच्या पुढच्या मार्च 2026 पर्यंतचे पैसे ठेवू शेवटी बजेटमध्ये 1-1 वर्षाचे पैसे ठेवता येतात असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com