का उगाच वण वण भटकताय? गुलामी पत्करण्यापेक्षा स्वाभिमानाने निर्णय घेऊ!
Sanjay Raut Eknath Shinde : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सत्ता काय तर पक्षही जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. शिंदे गटात 42 आमदार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शिवसेना बॅकफूटवर आली. शिवसेना (Shiv Sena) नेता संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची तयारी दर्शवली. परंतु आधी बंडखोरांनी मुंबईत यावे, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यांशी चर्चा करावी, अशी अट ठेवली आहे. त्यानंतर आता भाजपकडून प्लॅन-बीची अंमलबजावणी करण्यात येत आहे. (Big statement by Sanjay Raut, Shiv Sena ‘ready’ to dump Congress and NCP if rebels return)
चर्चेतून मार्ग निघू शकतो. चर्चा होऊ शकते. घरचे दरवाजे उघडे आहेत.. का उगाच वण वण भटकताय? गुलामी पत्करण्यापेक्षा स्वाभिमानाने निर्णय घेऊ! जय महाराष्ट्र! अशा आशयाचं ट्विट शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे. मात्र अद्यापही शिंदे गटाकडून कोणताही चर्चेचा किंवा तोडगा काढण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही.
शिंदेगटास शिवसेनेच्या ऑफरनंतर भाजपचा प्लॅन-बी
काय प्लॅन-बी
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोना झाला आहे. त्यामुळे ते रुग्णालयात दाखल आहेत. तसेच आमदारांना मुंबईत आणल्यास शिवसेनेकडून त्यांच्यांवर दबाव आणला जाऊ शकतो. त्यामुळे काही शिंदे समर्थक फुटण्याची शक्यता आहे. यामुळे भाजपने प्लॅन-बी तयार केला आहे. त्यानुसार राज्यपालपदाची जबाबदारी गोव्याचे राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांच्याकडे देण्यात येणार आहे. या परिस्थितीत एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांसह मुंबईऐवजी थेट गोव्यात जाऊन सर्व गोव्याच्या राज्यपालांसमोर परेड करु शकतात.
अशी होणार सत्ता
एकनाथ शिंदे गटाचे 42 आमदार आणि भाजप यांची युती होऊन राज्यात नवे सत्तासमीकरण येण्याची शक्यता आहे. त्या बदल्यात भाजपकडूनही एकनाथ शिंदे गटाला उपमुख्यमंत्रीपद12 मंत्री आणि केंद्रात 2 मंत्रीपद मिळणार आहे. राज्यात सत्ता स्थापनेसाठी 145 हा स्पष्ट बहुमताचा आकडा आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचे समर्थक जवळपास 50 आमदार आणि भाजपचे समर्थक 114 आमदार असे मिळून 164 आमदारांच्या साह्याने बहुमत विधानसभेत सिद्ध करत राज्यात भाजप+शिवसेना ( शिंदे गट ) असे सरकार स्थापन तयार होणार आहे.