शरद पवार यांना मोठा धक्का; मूळ राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांचाच

शरद पवार यांना मोठा धक्का; मूळ राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांचाच

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल वाचण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी काही गोष्टींवर भाष्य केलं. या पक्षात कुठलीही फूट पडलेली नाही.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल वाचण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी काही गोष्टींवर भाष्य केलं. या पक्षात कुठलीही फूट पडलेली नाही. अजित पवार केवळ सरकारमधून, पक्षातून बाहेर पडले आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरच दावा केला. पक्षात शरद पवारांचा गट आणि अजित पवारांचा गट अशी फूट पडली. त्यानंतर हा वाद निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांसमोर गेला. निवडणूक आयोगाने नुकताच निकाल देऊन अजित पवार यांना पक्षाचे अध्यक्ष असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर आज विधानसभा अध्यक्षांनी निकाल दिला.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर झालेल्या सुनावणीचा निकालही आज गुरुवारी (15 फेब्रुवारी) लागला आहे. यावेळेस राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचा आहे असं निरीक्षण व्यक्त केलं. विधिमंडळ गटात अजित पवार यांचं पाठबळ जास्त असल्यामुळे असा निकाल दिल्याचं विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केलं. तसेच अजित पवार गटाच आमदार पात्र ठरल्याचंही त्यांनी जाहीर केलं.

शिवसेना संदर्भात मी दिलेल्या निकालाचा दाखला याठिकाणी द्यावा लागेल. राष्ट्रवादी पक्षात अध्यक्ष पदावर दोघांकडून दावा केला जात आहे. दोन्ही गटांकडून पक्षाच्या घटनेप्रमाणे अध्यक्ष निवड झाली नसल्याचा दावा केला जात आहे. दोन समांतर नेतृत्व याठिकाणी उभे राहिले आहेत. तसेच दोन्ही गटांकडून अपात्रता याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. एनसीपी वर्किंग कमिटी ही पक्षाच्या घटनेप्रमाणे सर्वोच्च यंत्रणा आहे. त्यात 16 कायमस्वरूपी सदस्य आहेत. मात्र पक्षाची घटना कायमस्वरूपी सदस्यांना परवानगी देत नाही, असंही त्यांनी म्हटलंय.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com