मोठी बातमी! ठाकरे गटाच्या शुभांगी पाटील नॉट रिचेबल; चर्चांना उधाण
महेश महाले | नाशिक : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या नाशिक पदवीधर मतदार संघातील निवडणुकीत एक महत्त्वाची माहिती समोर येते आहे. अपक्ष उमेदवार असलेल्या शुभांगी पाटील या आता नॉट रिचेबल आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. निवडणुकीतून माघार घेतात का सरळ लढत देता हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दोन दिवसांपूर्वी अपक्ष उमेदवार असलेल्या शुभांगी पाटील यांनी शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांची भेट घेत शिवसेनेकडून पाठिंबा घेतला होता आणि निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचं त्यांनी विधान केलं होतं. तर दुसरीकडे सत्यजित तांबे यांनी देखील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत सर्व पक्षांनी पाठिंबा द्यावा ही विनंती केली होती.
या निवडणुकीसाठी भाजप देखील मैदानात उतरली असून भाजपचे संकट मोचक समजले जाणारे गिरीश महाजन हे नाशकात तळ ठोकून आहे. शुभांगी पाटील यांना माघार घेण्यासाठी आता गिरीश महाजन हे काय रणनीती आखता हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर शुभांगी पाटील या नॉटरिचेबल झाल्याने अनेक राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
तर, पदवीधर निवडणुकीतून आतापर्यंत 22 पैकी 4 जणांची माघार घेतली आहे. डॉ. सुधीर सुरेश तांबे, अमोल खाडे, दादासाहेब हिरामण पवार आणि भाजपकडून इच्छुक असलेले धनंजय जाधव यांनी माघार घेतली आहे. पक्ष श्रेष्ठींच्या आदेशाचे पालन करण्याचे कारण देत निवडणुकीतून माघार घेतली.