राजकारण
मोठी बातमी! बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळेंनी मारली बाजी, सुनेत्रा पवारांचा पराभव
राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे विजयी झाल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. लोकसभेची सात टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. इंडिया आघाडी विरुद्ध महायुती असा राजकीय संघर्ष राज्यासह देशभरात पाहायला मिळत आहे. अशातच लोकसभेचा आजचा निकाल पाहण्याची देशभरातील नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आज ४ जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे.
राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे विजयी झाल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. राष्ट्रवादी पक्षाच्या बारामतीत असलेल्या अस्तित्वाच्या लढाईत अखेर सुप्रिया सुळेंनी बाजी मारली.