राजकारण
मोठी बातमी! भाजपकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजीत गोपछडे यांना राज्यसभेची उमेदवारी
अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजीत गोपछडे यांना भाजपनं महाराष्ट्रात राज्यसभेसाठी उमेदवारी दिली आहे.
भारतीय जनता पक्षाने आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी त्यांच्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या 24 तासांनंतर अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.
अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजीत गोपछडे यांना भाजपनं महाराष्ट्रात राज्यसभेसाठी उमेदवारी दिली आहे. भाजपकडून याबाबत आज अधिकृत यादी जाहीर करण्यात आली.
राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक आहेत. अशात महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसत आहे. भाजपकडून महाराष्ट्रातील तीन जागांसाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या यादीत अशोक चव्हाण, भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा आणि कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णा आणि भाजपचे राज्य उपाध्यक्ष डॉ. अजित गोपछडे यांना संधी देण्यात आली आहे.