भातखळकरांनी केला भुजबळांचा फोटो मोर्फ, जयंत पाटलांनी केली कारवाईची मागणी
राज्यात अभूतपूर्व राजकीय गोंधळ सुरु आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरु आहे. हा सर्व गोंधळ सुरु असताना शिंदे- फडणवीस सरकारचे पहिले हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरु आहे. या अधिवेशना दरम्यान प्रचंड गदारोळ सुरु आहे. त्यातच भाजपचे आमदार अतुल भातखळकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचा सांताक्लॉजची टोपी घातलेला फोटो ट्विट करत खोचक टोला लगावला. त्यावरूनच आता राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आणि विधानसभेत थेट कारवाईची मागणी केली आहे.
विधानसभेत काय म्हणाले जयंत पाटील?
'मार्फिंग करणं निषेधार्ह आहे. सभागृहातील लोकच मार्फिंग करत असतील. या सभागृहातील ज्येष्ठ नेत्यांचं. यासंदर्भात काय करणार आहे?' अतुल भातखळकरांचं ट्विट दाखवत जयंत पाटील म्हणाले, 'भुजबळाचं मार्फ केलेला फोटो आहे. मूळ फोटोही माझ्याकडे आहे. अतुल भातखळकरांनी हे केलेलं आहे. अतुल भातखळकर हे सभागृहाचे सदस्य आहेत. हे गंभीर आहे. अतुल भातखळकर यांच्यावर कारवाई करावी,' असं जयंत पाटील म्हणाले.
काय होते भातखळकरांचे ट्विट?
सरस्वती देवीला न मानणारा एकदम ओरिजनल सांता क्लॉज... असे भातखळकरांनी ट्विट केले होते.