"शिवसेनेचे रक्तपात होईल शिवसेना संपेल"
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विधिमंडळात बहुमत सिद्ध केल्यानंतर शिवसेनेकडून बोलताना आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी पक्षाच्या बंडखोर आमदारांसह भाजप नेत्यांचाही चांगलाच समाचार घेतला आहे. एकनाथ शिंदे तुम्हाला हे शिवसेना विरुद्ध शिवसेना असे लढवत आहेत. शिवसेनेचे रक्तपात होईल शिवसेना संपेल. तुम्ही या ठिकाणी मुख्यमंत्री झाला म्हणून आनंद व्यक्त करतो. पण शिवसेना कशी वाचवायची यासाठी तुम्ही दोन पाऊले मागे या आणि शिवसेना वाचवा असे म्हणतं शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भावनिक आवाहन करताना भाजपवर चांगलेच संतापले आहेत.
'उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करताना सांगितलं की लोकशाहीतला दुसरा आवाजही ऐकला पाहिजे. म्हणून माझी खात्री आहे की विरोधी पक्ष म्हणून मी दुसरा आवाज आहे, माझेही काही शब्द, जे आवडो ना आवडो ते तुम्ही ऐकून घ्यावेत,' असं म्हणत भास्कर जाधव यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली आणि एकामागोमाग एक मुद्दा उपस्थित करत सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला.
शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी भाजपवर घणाघात केला आहे. विधानसभा सभागृहात भास्कर जाधव म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजही सांगतात की मी शिवसेनेचा आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सांगायचे आहे. मुख्यमंत्री झालात तुमच्यावर जबाबदारी आली आहे. आपण शिवसेना प्रमुखांचे नाव घेताल शिवसैनिक आहात. तुमची माझी उठबस झाली नाही. दोन टर्म समोरासमोर येत होतो. कोकणात जेव्हा पूर आला तेव्हा खऱ्या अर्थाने शिवसैनिक आणि वारसदार दिसला असे भास्कर जाधव यांनी शिंदेंच्या अभिनंदन प्रस्ताववर म्हटलं आहे.
शिवसेनेत कोण कोणाविरुद्ध लढणार
तुमचा माझा संबंध आला नाही. प्रत्येकाला मदत करण्यासाठी धावून जाता ही वस्तुस्थिती आहे. निवडणुकीवेळी भेटलो नाही आणि बोललो नाही. आपले काम पाहिले आहे. बाळासाहेबांचे आणि शिवसेनेचे नाव घेता फार मोठी जबाबदारी आहे. एका बाजूला ४० आमदार उभे आहेत. दुसऱ्या बाजूला शिवसेनेचे आमदार उभे आहेत. कोण कोणाच्या विरोधात लढणार आहे. कोण कोणाला घायाळ करणार आहे. कोण कोणाला धारातीर्थी पाडणार आहे. याचा विचार करा, माणसाने एकदा लढा पुकारला आणि लढाई लढण्यापूर्वी मला थांबायचे कुठे आहे. हे ज्याला कळतं तोच खरा योद्धा आहे.
शिवसेनेत रक्तपात होईल
एकनाथ शिंदे तुम्हाला हे शिवसेना विरुद्ध शिवसेना असे लढवत आहेत. शिवसेनेचे रक्तपात होईल शिवसेना संपेल. तुम्ही या ठिकाणी मुख्यमंत्री झाला म्हणून आनंद व्यक्त करतो. पण शिवसेना कशी वाचवायची यासाठी तुम्ही दोन पाऊले मागे या आणि शिवसेना वाचवा. तुमच्याबद्दल यांना काही प्रेम आले नाही असे अनेक उदाहरण तुम्हा सांगू शकतो असे शिवसेना नेते भास्कर जाधव म्हणाले आहेत.