कमलेश सुतार यांच्यावर गुन्हा दाखल; भास्कर जाधवांनी व्यक्त केला निषेध, म्हणाले...

कमलेश सुतार यांच्यावर गुन्हा दाखल; भास्कर जाधवांनी व्यक्त केला निषेध, म्हणाले...

किरीट सोमैया यांच्या व्हिडिओ प्रकरणी मुंबई पोलिसांनी 'लोकशाही' चॅनलच्या संपादकांविरोधातच गुन्हा दाखल केला आहे. याचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे.
Published on

चिपळूण : किरीट सोमैया यांच्या व्हिडिओ प्रकरणी मुंबई पोलिसांनी 'लोकशाही' चॅनलच्या संपादकांविरोधातच गुन्हा दाखल केला आहे. किरीट यांच्या तक्रारीनंतर संपादक कमलेश सुतार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळते आहे. याचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. तर, राजकीय वर्तुळातूनही यावर प्रतिक्रिया उमटत आहे.

कमलेश सुतार यांच्यावर गुन्हा दाखल; भास्कर जाधवांनी व्यक्त केला निषेध, म्हणाले...
'लोकशाही' चॅनलच्या संपादकांविरोधातच गुन्हा दाखल; Nana Patole म्हणाले...

लोकशाही चॅनलचे संपादक कमलेश सुतार यांच्यावर गुन्हा दाखल केल्याबद्दल भास्कर जाधव यांनी निषेध व्यक्त केला आहे. सरकारचे जालना घटनेवरून पूर्णपणे वस्त्रहरण झालेले आहे. त्यामुळे संपूर्ण राज्य त्यांचा धिक्कार करून निषेध करीत आहे. त्यामुळे जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी कमलेश सुतार यांच्यावर गुन्हा दाखल केला असावा, असे मला वाटत असल्याचे भास्कर जाधव यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com