17 जुलैपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही तर...; गोगावलेंचा अल्टीमेटम?

17 जुलैपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही तर...; गोगावलेंचा अल्टीमेटम?

राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीमध्येही बंडखोरी झाल्याने राजकीय वर्तुळात भूकंप झाला आहे.
Published on

मुंबई : राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीमध्येही बंडखोरी झाल्याने राजकीय वर्तुळात भूकंप झाला आहे. अशातच, रखाडलेला मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असल्याची चर्चा आहे. यामुळे कोणाला किती खाती मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. यावर शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया देत अप्रत्यक्षपणे अल्टीमेटम दिला आहे.

17 जुलैपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही तर...; गोगावलेंचा अल्टीमेटम?
अपात्रतेच्या नोटीसीवर संजय शिरसाटांची प्रतिक्रिया; कायदेशीर सल्ला घ्यावा लागेल

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बोलताना गोगावले म्हणाले, विस्तारात अडथळे आता काही राहिलेले नाहीत. आतापर्यंत विस्तार का होतं नव्हता त्याचं उत्तर आम्हाला ८ दिवसापूर्वी मिळालं ते आम्ही मान्य केलं. १७ जुलैच्या पूर्वी विस्तार होईल कोणाला किती जागा हे मुख्यमंत्री ठरवतील. 17 जुलैपर्यंत विस्तार नाही झाला तर आम्ही दोघं बसवून ठरवू, पण दोन दिवसात होईल, असे त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी फुटीनंतर रायगडच्या पालकमंत्री पदाची माळ सुनिल तटकरे यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता आहे. यावर भरत गोगावलेंनी नाराजी व्यक्त केली आहे. रायगडचं पालकमंत्रीपद हे शिवसेनेकडे राहिल हे स्पष्ट आहे. तटकरे साहेबांनाही वाटलं असेल आता ते पद आम्हाला मिळायला हवं. हे रायगड पालकमंत्रीचं खातं शिवसेनेकडेच असायला हवं ही माझी भूमिका आहे. तटकरेंना पालकमंत्री पद दिलं तर आमचा विरोध राहिलं, असे त्यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com