Bhagwant Mann Wedding: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान गुरुवारी दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकले आहेत. पदावर असतांना लग्न करणारे ते पहिले मुख्यमंत्री ठरले.
चंदीगडमधील मुख्यमंत्री निवासस्थानी 16 वर्षांनी लहान असलेल्या डॉ. गुरप्रीत कौर यांच्याशी मान यांनी लग्न केले. सकाळी 11 वाजल्यापासून विधी सुरु झाले होते.
भगवंत मान आणि गुरप्रीत यांच्या लग्नात दिल्लेचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित होते. केजरावाल यांनी वडिलांचे तर खासदार राघव चढ्ढा यांनी भावाचे विधी पार पाडला.
डॉ. गुरप्रीत कौर हरियाणातील पेवोहा येथील टिळक कॉलनीत राहतात. भगवंत मान आणि गुरप्रीत यांची पहिली भेट 2019 मध्ये झाली होती.
गुरप्रीत ३ बहिणींत सर्वात धाकट्या आहेत. मोठी बहीण नीरू यांचा विवाह अमेरिकेत झाला असून त्या नासात आहेत. दुसरी बहीण गोपी यांचे लग्न सुनाममध्ये (पंजाब) झाले होते. त्या ऑस्ट्रेलियात स्थायिक झाल्या आहेत.
गुरप्रीतचे वडील शेती करतात. त्यांच्याकडे कॅनडाचे नागरिकत्वही आहे. आई राजेंद्र कौर गृहिणी आहेत.गुरप्रीतचे वडील शेती करतात. त्यांच्याकडे कॅनडाचे नागरिकत्वही आहे. आई राजेंद्र कौर गृहिणी आहेत.
सीएम मान यांचे पहिली पत्नी इंद्रप्रीत कौरसोबतचे संबंध राजकारणामुळे बिघडले. पहिल्या पत्नीने कुटुंब आणि पंजाबमधून एकाची निवड करण्याचे सांगितले. त्यानंतर मान यांनी पंजाबची निवड करत इंद्रप्रीतला घटस्फोट दिला.