Eknath Shinde
Eknath ShindeTeam Lokshahi

मुख्यमंत्र्यांची खासदारांसोबतची बैठक म्हणजे 'वरातीमागून घोडे' : राष्ट्रवादी

केंद्रीय अर्थसंकल्पाला एक दिवस बाकी असताना विविध तरतुदींवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुंबईत महाराष्ट्राच्या सर्व खासदारांची बैठक बोलावली आहे.
Published on

मुंबई : केंद्रीय अर्थसंकल्पाला एक दिवस बाकी असताना विविध तरतुदींवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुंबईत महाराष्ट्राच्या सर्व खासदारांची बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्र्यांची बैठक म्हणजे वरातीमागून घोडे असेच म्हणावे लागेल, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे.

Eknath Shinde
मी काँग्रेस पक्षाचाच फॉर्म भरला होता, पण...: सत्यजित तांबे

केंद्रीय अर्थसंकल्प दिनांक १ फेब्रुवारीला सादर होणार आहे. फक्त एक दिवस बाकी असताना, महाराष्ट्राच्या विकासासाठी खासदार केंद्रीय अर्थसंकल्पात सूचना कशा जोडू शकतात. मुख्यमंत्र्यांना दिनांक १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प आहे हे आठवते का? असा सवालही महेश तपासे यांनी केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यातील विकास कामांबाबत जर गंभीर असते तर त्यांनी किमान महिनाभरापूर्वी सर्व खासदारांची बैठक बोलावायला हवी होती आणि केंद्र सरकारच्या सर्व प्रकल्पांचा आणि विविध योजनांसाठीच्या आर्थिक वाटपाचा आढावा घ्यायला हवा होता आणि त्यानंतर अर्थमंत्रालयाकडे सूचना पाठवायला हव्या होत्या, असेही महेश तपासे यांनी म्हंटले आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सर्व खासदारांची बैठक बोलावणे म्हणजे पब्लिसिटी स्टंटशिवाय दुसरे काही नाही, अशी शब्दात महेश तपासे यांनी टीका केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com